हैदराबाद येथे मादिगा समाजाचा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या महामेळावा संदर्भात उदगीर येथे बैठक
लातूर/प्रतिनिधी:लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील समाज बांधवांना विनम्र आवाहन करण्यात येते की,दि.११/११/२०२३ रोजी हैदराबाद येथे मादिगा समाजाचा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात महामेळावा आहे.या मेळाव्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात घोषणा करण्याची आशा आहे.
मांग,मादिगा समाजाची ताकद दाखविण्यासाठी पंचवीस लाख समाज बांधव महामेळाव्यास येणार आहे.या महामेळाव्याचे नेतृत्व मादिगा समाजाचे नेते मंदा कृष्णा मादिगा करणार आहेत.या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी मादिगा समाजाचे नेते सत्यमअण्णा रागाटी दि.३/११/२०२३ रोजी वार शुक्रवार ठीक १२.०० वाजता उपस्थित राहणार आहेत तरी नांदेड लातूर जिल्ह्यातील मातंग समाजातील तथा अनुसूचित जातीतील आरक्षणापासून वंचित असलेल्या जातीतील समाज बांधवांनी बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य राजकुमार मस्के,प्रा रामकिशेन सोनकांबळे,प्राचार्य गोविंद भालेराव,प्रा.शिवाजीराव देवनाळे,प्रा.रामभाऊ कांबळे, रूपेंद्र चव्हाण, अँड विष्णू लांडगे, पप्पू गायकवाड, प्रल्हाद येवरीकर अँड व्यंकट वाघमारे,प्रा.डाॅ.बंकट कांबळे, भीमराव भांगे, विलास देवनाळे,प्रा.संजय बिबिनवरे, प्रेम तोगरे, डॉ विष्णू कांबळे,लक्ष्मीकांत मोरे, पंडित सूर्यवंशी,रंजीत कांबळे शेह्लाळकर, शेषेराव करखेलीकर, रेणुकाताई उपाडे, अजितदादा कांबळे प्रा.डाॅ.सुशीलप्रकाश चिमोरे यांनी केली आहे.
बैठकीचे ठिकाण :शुभंकर हॉल, दंडवते कॉम्प्लेक्स, कृष्णकांत चौक, जळकोट रोड, उदगीर जिल्हा लातूर
वार – शुक्रवार
स्थळ – शुभंकर हॉल,
दंडवते
कॉम्प्लेक्स
कॅप्टन चौक, जळकोट रोड, उदगीर