जे.एल.जी समूहांना शेळीपालन व विविध व्यवसायासाठी कर्ज वाटप आणि मोफत महिला आरोग्य तपासणी
(आनंद भालेराव किनवट ता. प्रतिनिधी )
किनवट (घोटी )येथे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक ,नाबार्ड, महाराष्ट्र ग्रामिण बँक किनवट/ माहुर, गृहलक्ष्मी महिला ग्रामविकास संस्था किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने JLG संयुक्त देयता समुह शेळी पालन व विविध व्यवसायसाठी कर्ज वाटप तथा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात होते .
या मेळाव्यात ५० संयुक्त देयता समुहास १ कोटी दोन लक्ष रुपयांचे मंजुरी पत्र देण्यात आले तसेच महिलांची मोफत आरोग्य तपासणी सानेगुरुजी रुग्णालय किनवट परिवारा तर्फे करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक मा. निखील नाफडे यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा. डॉ.अशोक बेलखोडे किनवट हे लाभले या कार्यक्रमास विशेष उपस्थिती प्रा. डॉ . सुनिल व्यवहारे, मा. शाखाधिकारी किनवट एम.जी . बी रूपेश दलाल, शाखाधिकारी बोधडी एम.जी.बी. अमोल चांदेकर , मा. पंढरीनाथ ठाकरे बीसी , मा. रोशन पेंदोर शा. अ. MGB वाई बा., दिपंकर पाटील, शा. अ. माहुर MGB हे मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना गृहलक्ष्मी महिला ग्रामविकास व किनवट संस्थेच्या अध्यक्षा सौ. संगिता पाटील यांनी मांडली, सुत्रसंचालन आत्मानंद सत्यवंश यानी केले तर आभार सौ. सुचिता फुलझेले यांनी मानले या कार्यक्रमास हजारो संख्येच्या प्रमाणात महिला व पुरुष , शेतकरी उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी सहकार्य संकेत वंजारे, राधा बोलेनवार, मारोती कदम, अनुसया तडसे, लक्ष्मीबाई पेंदोर, अर्चना गुट्टे इत्यादींनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.