माजी आमदार प्रदीप नाईक यांनी मतदार संघ पुन्हा पिंजून काढण्यास केली सुरुवात | “गाव भेटी व युवा संवाद यात्रेस” बेल्लोरी येथे प्रचंड प्रतिसाद
किनवट/प्रतिनिधी: किनवट माहूर विधानसभेत गेले तीन टर्म आमदार राहिलेले माजी आमदार प्रदीप नाईक यांनी मतदार संघ पुन्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली असून मतदारसंघाच्या प्रत्येक गावात पोहोचून विविध समस्या जाणून घेत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक गावातून माजी आमदार प्रदीप नाईकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
आज माजीआमदार प्रदीप नाईक किनवट तालुक्यातील “गाव भेटी व युवा संवाद यात्रा” निमित्त बिल्लोरी या गावी पोहोचले. प्रदीप नाईक गावात पोहोचताच गावाच्या चौका पासून डफडे वाजवत आदर पूर्वक कार्यक्रमाच्या ठिकाणी नेहून गावकऱ्यांतर्फे भव्य सत्कार व स्वागत करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी गावातील समस्या जाणून घेतल्या व त्या ठिकाणाहून सोडन्याचा प्रयत्न सुद्धा केला.
यावेळी राष्ट्रवादी चे ता. अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड,माजी जि.प.सदस्य दिनकर दादा दहिफळे, कृ.बा.स. सभापती अनिल पाटील कराळे,माजी नगराध्यक्ष साजिद खान, विधानसभा अध्यक्ष राहुल नाईक,राष्ट्रवादी यु.ता.अध्यक्ष बालाजी बामणे, संतोष माडपेल्लेवार, वेंकट बंडीवार,राम शेपुरवार, राम नेमानिवार,चंडी यादव, वेंकट नेमानिवार, रोहन पिसारीवार, रोहित येमुळवार,कार्तिक तिरमनवार व गावातील ज्येष्ठ नागरिक व युवा मित्र मंडळ उपस्थित होते.