किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

लोकशाही,संविधान रक्षणासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ; उद्धव ठाकरे यांची गर्जना

*मराठवाडा विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*छत्रपती संभाजीनगर*:दि.2.महाविकास आघाडीची एकीची वज्रमूठ आवळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या विशाल मैदानावर रविवारी विराट महासभा झाली. महाविकास आघाडीच्या या वज्रमूठ सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होतो.

या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि मिंध्यावर तोफ डागली.तसेच सत्ताधाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीसाठी मैदानात उतरावे, असे आव्हानही नेत्यांनी दिले आहे.

या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंध्यावर आणि भाजवर आसूड ओढले. तसेच तुम्ही मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला,असे तुमचे नेते म्हणत आहेत.याच दगडांना सोबत घेत तुम्ही निवडणूक लढवणार का, असा सवालही त्यांनी भाजपला केला.

आमचे हिंदुत्वाचे विचार स्पष्ट आहे.आम्हाला कोणीही शिकवण्याची गरज नाही.जे माझ्या आजोबांनी,वडिलांनी सांगितले,तेच मी सांगतो, आदित्यही तेच सांगेल.राष्ट्रभक्ती हेच आमचे हिंदुत्व आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घेत जे गौरव यात्रा काढत आहेत. मात्र,स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 14 वर्षे ज्या मरणयातना सोसल्या,ते देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी.अनेकांनी बलिदानाने आणि लढाईनंतर हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे.तेच स्वातंत्र्य आता धोक्यात आले आहे.देशाची न्यायव्यवस्थाही त्यांना ताब्यात घ्यायची आहे.

देशाची न्यायव्यवस्था त्यांच्या ताब्यात गेली तर आपल्याला लोकशाहीला श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल,असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.त्यामुळे आता कशालाही न घाबरता,देशातील लोकशाही रक्षणासाठी ही वज्रमूठ वापरावी लागेल,असेही ते म्हणाले. यावेळी इस्त्रायलमधील लोकशाही वाचवण्यासाठी जनता कशी एकत्र आली होती,याची माहितीही त्यांनी दिली.

सत्ता मिळवण्यासाठी आम्ही काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटत होतो,असे ते म्हणतात. तर सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही मिंध्यांचे काय चाटत आहात, असा सवालही त्यांनी केला. तसेच मेहबुबा मुक्ती यांच्यासोबत सरकार स्थापन करताना त्यांचे हिंदुत्व कोठे गेले होते.

नीतीशकुमार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यासाठी तुम्ही त्यांचे काय चाटले होते.तसेच निवडणुकीपूर्वी संगमा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केले. मात्र,निवडणुकीनंतर ते त्यांच्यासोबतच सत्तेत आहेत. त्यावेळी तुम्ही संगमा यांचे काय चाटले होते,असा सवाल करत त्यांनी भाजपवर तोफ डागली.
राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे.

त्यामुळे उद्योगधंदे राज्यात येत नाहीत.आहेते उधोग गुजरातला घेऊन जाण्यात येत आहेत.त्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही महाराष्ट्र सरकार शक्तीहीन, नपुंसक असल्याचे मत नोंदवले आहे.

सरकारचे काय सुरू आहे,हे यावरून दिसून येते. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी राज्यातील महापुरुषांचा अपमान केला. हा अपमान राज्यातील जनता सहन करणार नाही,असे राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठणकावले. राज्यातील महापुरुषांचा अपमान होत असताना त्यांनी कोणत्या यात्रा का काढल्या नाहीत,असा सवालही त्यांनी केला. राज्यावर संकट येते,त्यावेळी मराठी माणूस एकत्र येत ते संकट परतावून लावतो.आताही अशीच एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे,असे पवार म्हणाले.

राहुल गांधी यांनी अदानी यांच्या संपत्तीबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांची खासदारकी काढण्यात आली.राज्यघटना आणि संविधानावर होणाऱ्या या हल्ल्याविरोधात जनता आता उभी राहिली आहे.

जनतेत सत्ताधाऱ्यांविरोधात रोष आहे.नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधून ते दिसून आले आहे,असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले.

*अशी झाली महाविकास आघाडीची विराट सभा*

लोकशाही,संविधान,घटना रक्षणासाठी ही वज्रमूठ निवडणुकीत मतदानासाठी वापरा.संघर्ष करून लढून मिळवलेले स्वातंत्र्य घाबरून सोडणार का
आपल्या देशासाठी त्याने बलिदान केले.धर्म कोणताही असो, त्याने देशासाठी बलिदान केले.आपल्या लष्करातील जवान औरंगजेब याचे अपहरण करून त्याला मारण्यात आले.
माझे आजोबा आणि वडिलांनी सांगितले तेच मी सांगतो, आदित्यही तेच सांगेल.
आम्हाला शिकवायला जाऊ नाका,आमचा विचार स्पष्ट आहे.

ते स्वातंत्र्यच आता धोक्यात आले आहे. त्यासाठी आपल्याला वज्रमूठ करावी लागेल.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 14 वर्षे यातना सोसल्या,ते देश स्वतंत्र करण्यासाठी केले
शिवसेनेने मोठी केलेली माणसे गेली,मात्र,मोठी करणारी माणसे आपल्यासोबत आहेत.

आता हेच दगड घेऊन तुम्ही निवडणुका लढणार आहात का
आम्ही मनावर दगड ठेवत हा निर्णय घेतला आहे, असे भाजपने म्हटले आहे.प्राण जाये पर वचन न जाय,हे आमचे हिंदुत्व आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन,हे वचन मी माझ्या वडिलांना दिले होते,ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.

त्यांच्या हातात भगवा शोभत नाही. भगवा आणि हिंदुत्वाचा अपमान करू नका.
शिवसेनेत असताना त्यांनी असे केले असते तर त्यांना तेव्हाच पक्षातून हाकलले असते.
तुमचा मंत्री सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्याबाबत अपशब्द वापरतात,हेच त्यांचे हिंदुत्व आहे काय?
लालूप्रसाद यादव यांच्या सुनेची ती बेशुद्ध होईपर्यंत चौकशी केली जाते,हेच त्यांचे हिंदुत्व आहे का
कोरोना काळात राजेश टोपेंनी चांगले काम केले,त्यांना औषधांची नावे पाठ होती, सध्याच्या आरोग्यमंत्र्यांबाबत काय बोलणार
सभेमध्ये तुम्ही भाषणा वाचू का असे विचारतात.मात्र, जनता मतदानासाठी उतरेल तेव्हा तुम्ही वाचू शकणार नाही..
तुमच्या सभेला तुम्ही खुर्च्या भाड्याने आणतात, माणसे तुम्ही भाड्याने आणू शकत नाही.

ती माणसे शवटपर्यंत थांबत नाही
मोदींचे नाव घेऊन तुम्ही मैदानात या,मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो.बघूया जनता कोणाच्या बाजूने आहे.
मी माझ्या वडिलांचे नाव सोडणार नाही.

त्यांनी आपला पक्ष चोरला आहे, चिन्हही चोरले आहे, आता ते माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपची पालखी वाहण्यासाठी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली नाही.आपला वापर त्यांनी केला आहे.

भाजप राजकारणात अस्पृश्य असताना आम्ही भाजपला खांद्यावर घेऊन फिरवले.
कोरोना काळात आपण घरात बसून जे काम केले,ते तुम्ही वणवण फिरुनही करू शकत नाही.

आम्ही दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले होते.ते शोतकऱ्यांना मिळाले आहे.आम्ही जे बोललो तर केले,आम्ही फसवाफसवीचे काम केले नाही.

पीकविम्याच्या नावाखाली फक्त 10 रुपयांचा चेक देण्यात येतो.
अवकाळीने शेतीचे नुकसान झाले आहे.मात्र,सरकारने फक्त घोषणा केल्या आहेत.
आपल्याही देशात जनतेने एकवटले आहे.घटनेचे रक्षण करण्यासाठी आमचे मावळे समर्थ आहेत.

जनतेचा रेटा बघून त्यांना त्यांचे प्रयत्न सोडावे लागले,अशी लोकशाही असायला हवी
असाच प्रयत्न इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी केला होता,त्यावेळी जनता त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली होती.

देशातील लोकशाही यांच्या हातात आली,तर देशातील लोकशाहीला आपल्याला श्रद्धांजली वाहावी लागेल
भाजपला न्यायव्यवस्थेवरही अधिकार स्थापन करायचा आहे.
लोकशाही ही इस्त्रायलसारखी असायला हवी.त्यांनी वाळवंटातही शेती केली.
तुम्ही त्यांचा आदर्श ठेवत पाकव्याप्त कश्मीर जिंकून दाखवा सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीसी कारवाई करून मराठवाडा देशात आणला
जमीन दाखवायची असेल, पाकव्याप्त कश्मीरची जमीन जिंकून दाखवा,आहे तुमच्यात हिंमत आपल्या देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

देशातील लोकशाही संपवायची, आपल्या पक्षाशिवाय एकही पक्ष राहता कामा नये,हेच त्यांचे धोरण आहे.एकेकाळी भाजपच्या व्यासपीठावर सांधीसंत असायचे. आता त्यांच्या व्यासपीठावर सर्व संधीसाधू आहेत.

देशातील सर्व भ्रष्ट माणसे भाजपमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी पक्षांचे नाव भ्रष्ट जनता पार्टी करावे आता भाजपने ज्या संगमा यांच्यावर आरोप केले होते, त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करून तुम्ही त्यांचे काय चाटत आहात
आज देशात जी परिस्थिती आहे, विरोधी पक्षांचा नाहक छळ सुरू आहे.

मोदी म्हणतात,मेरी प्रतिमा खराब करने का काम चल रहा है,हे सर्व कोण करतेय,याचा त्यांनी विचार करावा आम्ही सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे तळवे चाटले असे म्हनतात तर सत्तेसाठी तुम्ही मिंध्याचे काय चाटत आहात
सत्तेसाठी आम्ही एकत्र होतो, असा आरोप करतात मात्र सत्ता गेल्यावरही आम्ही एकत्र आहोत.

महाविकास आघाडीचे सरकार ज्या पद्धतीने पाडले, ते तुम्हाला मंजूर आहे का
महाविकास आघाडीचे सरकार तुमची कामे करत होते काय
पंतप्रधानांची पदवी मागितली तर 25 हजाराचा दंड होतो, अशी कोणती पदवी आहे.

तुमच्याकडे
तुम्ही सांगाल तो हिंदू,तुम्ही सांगाल तो देशद्रोही,ही तुमची मस्ती गाडण्यासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ उभी आहे.
आमच्या हिंदुत्वाचे मोजमाप करण्याचा अधिकार तुम्हाला नाही.

आपण काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असे म्हणता, मग मेहबुबा मुक्तीसोबत तुम्ही सरकार स्थापन केले तेव्हा तुम्ही काय सोडले होते.

आम्ही हिंदुत्व सोडल्याचे एकतरी उदाहरण द्या, उद्धव ठाकरे यांचे आव्हान महाविकास आघाडीचे सरकार असताना कोणत्याही धर्मीयांवर आक्रोश करण्याची वेळ आली नाही.

सर्वोच्च नेता पंतप्रधान असताना हिंदूना आक्रोश करावा लागत आहे.त्या नेत्यांची शक्ती काय कामाचीआता हिंदू आक्रोश मोर्चा, गौरव यात्रा काढत आहे.

समाजात तेढ निर्माण करून निवडणुकीत वातावरण तापवत आहेत.ते काहीही करत नाही, फक्त कोंबेडे झुजवण्याचे त्यांचे काम सुरू आहे.

जे भाजपला जमले नव्हते, ते महाविकास आघाडीने करून दाखवले आहे.त्याचा अभइमान आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे नामकरण केले आहे.

मा.हिंदुहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला छत्रपती संभाजीनगर हे नाव दिले.या ठिकाणी आपण आलोय तेव्हा गर्दी असते. आजही येथे जनतेचा महासागर दिसत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात
तळागाळापर्यंत आपली ही वज्रमूठ आपल्याला पोहचवायची आहे.

कोरोना काळात महाविकास आघाडीने केलेल्या कामाचे जगभरात कौतुक झाले आहे.
राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे. त्यामुळे उद्योगधंदे येताना विचार करत आहे. त्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे.

आम्ही आमचे मत मांडी, तुम्ही तुमचे मत मांडा,मात्र,हे सरकार जनतेचे लक्ष विचलीत करत आहे.

ही सभा होऊ नये,यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले. ही कोणते सरकार केंद्रात तुमचे सरकार आहे,राज्यात तुमची सत्ता असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या
हे सरकार आल्यावर राज्यातील उद्योगधंदे राज्याबाहेर गेले, याचा दोष कोणाचा आहे.
हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे.या पद्धतीने हे सरकार सुरू आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेसाठीही लाजिरवाणे आहे.

महाराष्ट्रातील सरकार हे शक्तीहीन,नंपुसक सरकार असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.महाराष्ट्राची जनता महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही.
गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही.मात्र,त्यांच्या दुटप्पी भूमिकेचा आम्ही निषेध करतो.
सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी राज्यातील महापुरुषांचा अपमान केला. त्यावेळी का आंदोलने केली नाही.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम साजरा करायला हवा,मात्र,त्यासाठी सरकार सकारात्मक नाही
आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. तिथे आपल्याला न्याय मिळेल हा विश्वास आहे.

देशासाठी हे खूप धोकादायक आहे. सर्वच अर्थचक्र धोक्यात येईल.असेच घटना सुरू राहिल्या तर राज्यात आणि देशात स्थिरता राहणार नाही.

संविधानाला तिंलाजली देत राज्यातील सरकार पाडण्यात आले महाराष्ट्रावर कोणेतही संकट येते,तेव्हा येथील माणूस एकजूट करत येतो, हे येथील वैशिष्ट्य आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संबोधनाला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज,ज्योतिबा फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबोडकर, प्रबोधनकार ठाकरे,मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,अजित पवार,बाळासाहेब थोरात आणि नेत्यांकडून भारत मातेचे आणि संविधानाचे पूजन
सरकारविरोधातील जनतेचा रोष स्पष्ट दिसत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधून तो कल दिसून आला आहे.
आताच्या सरकारचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष होत आहे. या सरकारने स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी ठरावही केला नाही.

मराठवाड्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीने भरघोस निधी मंजूर केला होता.
हे वर्ष मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासारखा भला माणूस आपण पाहिला नाही, महाराष्ट्र हिताच्या प्रत्येक कामाला त्यांनी पाठिंबा दिला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सभास्थळी आगमन
आपल्या देशात लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

हे आपल्याला जनतेला चालणार आहे का,याचे उत्तर जनतेने द्यायचे आहे.त्यांना निवासस्थान रिकामे करण्याची नोटीसही पाठवण्यात आली.अदानी यांच्या संपत्तीबाबत प्रश्न विचारल्याने राहुल गांधी यांची खासदारकी काढण्यात आली.
काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांच्या संबोधनाला सुरुवात
महाविकास आघाडीची वज्रमूठ सत्तेत येणारच विविध सर्वेक्षणातून जनतेचा सरकारविरोधातील रोष दिसून येत आहे.राज्यघटना आणि संविधानावर होणाऱ्या हल्ल्याविरोधात जनता उभी राहिल्याचे चित्र दिसत आहे.

राहुल गांधी यांनी अदानी यांच्या संपत्तीबाबत विचारलेल्या प्रश्नांना अजून उत्तरे देण्यात आलेले नाही
देशातील लोकशाही कोणत्या दिशेने जात आहे,याचा विचार करण्याची गरज आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संबोधनला सुरुवात
शेतकऱ्यांच्या मदतीची फक्त घोषणा केली,प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीही मिळाले नाही.

*धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर डागली तोफ*

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या संबोधनाला सुरुवात
या सभेच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये भगवे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.
या सभेत महाविकास आघाडीची वज्रमूठ दिसून येत आहे.

सभास्थळी जनतेचा अथांग महासागर लोटला
महाविकास आघाडीच्या विराट सभेला छत्रपती संभाजीनगरमध्ये दणक्यात सुरुवात झाली होती.

247 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.