कोठारी कमान येथे घराचे कुलूप तोडून अंदाजे साडेतीन लाखाची चोरी
किनवट/प्रतिनिधी: दिनांक 31मार्च2023 रोजी किनवट पासून 2 किमी अंतरावर असलेल्या कोठारी कमान येथे घराचे कुलूप तोडून अंदाजे साडेतीन लाखाची चोरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एडविन जोसेफ नासिस वय 34 वर्ष व्यवसाय खाजगी कोचिंग क्लासेस रा.बल्लारपूर ता.बल्लारपूर जि. चंद्रपूर
ह. मु.कोठारी कमान ता. किनवट यांच्या घरी अज्ञात आरोपीने 31/03/2023 रोजी वेळ अंदाजे सकाळी 09:00 वाजता ते दुपारी वेळ अंदाजे 03:10 वाजताचे दरम्यान चोरी केली आहे. यात अज्ञात आरोपीने फिर्यादीचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून लोखंडी कपाट उघडून सोन्या चांदीचे अंदाजे 03,34,947 रुपये किंमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशन किनवटला दिल्यावरून पो.नि.दिपक बोरसे यांच्या आदेशाने गु.र.नं. 82/2023 कलम-454,380भा.द.वि.प्रमाणे
गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी पो. उप.नि. सावंत हे करीत आहेत.