प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,निष्काम सेवाभावी संस्था व काॅंग्रेस समर्थक संघटन राहूल गांधी विचार मंचच्या नांदेड शहर व जिल्हा कमेटी यांच्या वतीने “शहीदाना अभिवादन करण्यातआले
*नांदेड*: जिल्यातील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व निष्काम सेवा संघ तसेच काॅंग्रेस समर्थक संघटन राहूल गांधी विचार मंचच्या नांदेड शहर व जिल्हा कमेटी यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त अबचलनगर येथे शहिदांना अभिवादन करण्यात आले
या अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात संत बाबा ज्योतिंदर सिंघजी मित्त जत्थेदार श्री हजुर साहेब नांदेड व
संत बाबा बलविंदर सिंघजी कारसेवावाले याच्या शुभहस्ते शहीद स. भगत सिंघजी,शहीद सुखदेवजी, शहीद राजगुरुजी यांच्या प्रतिमेस शिरोपाव व पुष्पहार अर्पण करण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गुरूद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष लड्डूसिघ महाजन होते व प्रमुख उपस्थितीत गुरुद्वारा बोर्डाचे मा.सचिव भागिदर सिंघ,रविंदर सिंघ,सुरिंदर सिंघ मा. सदस्य, रामराव थडके अध्यक्ष माजी सैनिक संघटना,पठाण साहेब अध्यक्ष माजीसैनिक संघटना, विरेंदरसिंघ गाडिवाले मा.सभापती,शंकररराव नांदेडकर अध्यक्ष विश्वासू प्रवासी संघटना, इजिं.हरजिंदर सिंघ संधू शहरजिल्हाध्यक्ष सो.मी.काँग्रेस नांदेड व राष्ट्रीय प्रभारी राहूल गांधी विचार मंच इंडिया,चंदा रावळकर जिल्हा समन्वयक,जोशी मॅडम यांच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
यावेळी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजक राजकमल सिंघ गाडिवाले शहरजिल्हाध्यक्ष राहूल गांधी विचार मंच या संघटनेचे नांदेडचे सर्व पदाधिकारी, निष्काम सेवाभावी संस्था व संजीवकुमार गायकवाड जिल्हाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ संघटनेचे नांदेडचे सर्व पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादनाचे आयोजन अबचलनगर शहीद भगत सिंघ मार्ग येथे करण्यात आले.
यावेळी आयोजका कडून प्रथम शहीदांना पुष्प अर्पण करून अभिवादन करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माजी सैनिकाचे शाल टाकून सन्मान करण्यात आले
यावेळी आयोजकाच्या वतीने राजकमल सिंघ गाडिवाले यांनी प्रास्ताविक केले व शहीदाबद्दल माहीती दिली व 23 मार्च “शहीद दिनी” सर्व शाळा,कॉलेज येथे शहीदांना अभिवादन करण्यात यावे ही विनंती महाराष्ट्र शासनास केली
यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना लड्डूसिघजी महाजन यांनी शहीदांना नमन केले व युवा पिढिला शहीदाच्या प्रेरणेने चलावे असे सांगितले
या कार्यक्रमास उपस्थिताचे आभार सुनिल खिल्लारे सचिव राहूल गांधी विचार मंच नांदेड यांनी व्यक्त केले
या अभिवादन कार्यक्रमास जालिंदर नरवाडे उपाध्यक्ष राहूल गांधी विचार मंच नांदेड,नांदेडचे बहुसंख्य माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक दिपक सिंघ गल्लीवाले, नारायण सिघ वासरिकर, दिप सिघ गाडिवाले,केरसिघ, हरबंससिंघ वासरिकर,जगजीवन सिंघ रीसालदार,गुरूसागर सिंघ सुखमणी,
हरपाल सिंघ ठेकेदार,बलवंत सिंघ,
गुरुचरण सिंघ चंदन, राजींदरसिंघ, आहदखान,सुहास देशमुख,अबचल नगरचे रहीवासी व सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते