किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी-प्रकाश गब्बा राठोड

किनवट /प्रतिनिधी:येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी असे निवेदन माननीय पोलीस अधीक्षक नांदेड यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी पाठवले आहे.
किनवट व परिसरातील कायदा व सुव्यवस्था ही श्रीकांत कांचरलावार यांच्या मृत्यूनंतर अत्यंत बिघडलेली होती. त्यावेळी किनवट पोलीस स्थानकातील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यावर शहरातील नागरिकांचा प्रचंड रोष होता. परंतु त्यानंतर आपण पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना किनवट येथे पाठवल्यावर श्री बोरसे यांनी शहरातील कायद्याची बिघडलेली स्थिती व्यवस्थित केली. लोकांमध्ये पोलिसाबद्दल पुन्हा विश्वास संपादन केले. वाहतूक व्यवस्था, रात्रीच्या गस्ती, महिलांची सुरक्षा, कोचिंग क्लासेस जवळील कायदा व्यवस्था, सार्वजनिक कार्यक्रम करिता लागणारे आवश्यक समन्वय अशा सर्व आवश्यक बाबी अत्यंत चोखपणे पार पाडून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. तर त्यांच्या कार्यपद्धतीवर सर्वच स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची अचानक झालेली बदली ही किनवट व परिसरातील नागरिकांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे त्यांना परत किनवट पोलीस स्थानकात रुजू करावे ही जनभावना असून या जनतेचा आदर ठेवत आपण पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना पुन्हा किनवट पोलीस स्थानकात रुजू करावे अशी विनंती प्रकाश गब्बा राठोड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने करण्यात आली आहे.
बदली झाल्याचे समजताच सोशल मीडिया मधूनही किनवटकरांच्या भावना दीपक बोरसे यांच्या बद्दल चांगल्याच दिसून आल्या.
KTN महाराष्ट्र NEWS किनवट, नांदेड

90 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.