माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांचे आदेशनुसर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष के.सुर्यकांत रेड्डी यांची राजीनामा नामंजूर
किनवट/प्रतिनिधी: किनवट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष के.सूर्यकांत रेड्डी यांनी 15 मार्च रोजी सकाळी आपल्या तालुकाध्यक्ष राजीनामा वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या राजीनामा यावरून उलटसुलट चर्चेला देखील उदान आले होते. काँग्रेसचे किनवट तालुका अध्यक्ष केसूर्यकांत रेड्डी यांचा राजीनामा वरिष्ठ काँग्रेस पक्षातील नेत्याकडून नामंजूर करण्यात आला आहे. सूर्यकांत रेड्डी यांनी 15 मार्च रोजी व्यक्तिगत कारणाचे कारण सांगत पक्षश्रेष्ठीकडे राजीनामा पाठवला होता.परंतु पक्षश्रेष्ठी कडून के. सूर्यकांत रेड्डी यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या चार वर्षापासून ते तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात चार वर्षापासून ते किनवट तालुका पद यशस्वीपणे सांभाळत आहेत.