मानवाच्या जीवनातील धोके दूर करण्यासाठी महापुरूषांनी जीव धोक्यात घालून कार्य केले- डॉ. हनुमंत भोपाळे
मुखेड/प्रतिनिधी -विषमतावादी,धर्मांध,अंधश्रध्द, सत्तांध, अत्याचारी लोकांचा बिमोडकरून मानवी जीवन सुखकर करणे धोक्याचे असते.विषमतावादी लोकांकडून महापुरुषांना मानसिक,शारीरिक छळ करावा लागतो.अपमान,अपेक्षा, निंदानालस्ती,विषारी टीकेला
सामोरे जावे लागते.जीवाला धोका असतो,प्रतिकूल परिस्थितीला
अनुकूल करण्यासाठी महापुरुषांनी जीवाची पर्वा न करता स्वतः चा आणि आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून
कार्य केले.त्या महापुरुषांचे आपल्यावर अनंत उपकारक
आहेत असे प्रतिपादन सुप्रसिध्द साहित्यिक तथा व्याख्याते डॉ.हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी केले.ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान )महाविद्यालय, कोटग्याळ,वसंतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील महापुरुषांचे योगदान या विषयावर बहि:शाल व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना बोलत होते.विचार पीठावर कार्यक्रमाचेअध्यक्ष प्राचार्य डॉ.हरिदास राठोड,प्राचार्य राम नरेश चेनुरी
डॉ. हिमगिरे प्रा.डॉ. मदन गिरी आदींची उपस्थिती होती. डॉ.हनुमंत भोपाळे पुढे बोलताना म्हणाले,महाराष्ट्राला महापुरुष लाभले ही अतिशय गौरवाची बाब आहे.हेच आपले खरे नायक महानायक आहेत. त्यांचे विचार आणि कार्य पुढे नेणारी माणसंच त्याचे खरे वारसदार ठरतात.आजही सरंजामशाही, अस्पृश्यता,जात्यांधता, धर्मांधता, अंधश्रद्धाअज्ञान, निरक्षरता समाजात
काही प्रमाणात टिकून आहे. ह्या सर्व प्रगतीच्या आड येणा-या बाबींच्या निर्मूलनासाठी महापुरुषांच्या वारसांनी
पुढे येण्याची गरज आहे.वारकरी संतानी मानवतावादी मूल्यांची पेरणी करताना छळ सहन केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पारतंत्र्यातून जनतेची सुटका करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी विलक्षण संघर्ष केला.
छत्रपती संभाजी राजांनी स्वराज्य विस्तार करताना बलिदान दिले.यांच्या बलिदानाचा विसर पडल्यामुळे आणि विषमतावादी लोकांमुळे स्वराज्य गेले.पुन्हा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी
बलिदान दिले.महात्मा बसवेश्वर,संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ संत तुकाराम महाराज,संत गाडगेबाबा,संत तुकडोजी महाराज आदी संतांनी मानवी मूल्यांचा
पेरणी केली.महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून
मानव घातकी बाबींचे कायदेशीर
निर्मुलन करून समता आणि न्याय व्यवस्थेची पेरणी केली. विषमतावादी व्यवस्थेचे दलाल
आजही विषमतावादी विकृतीरुजविण्यासाठी सक्रिय झाल्यामुळे आपल्या समतावादीसंस्कृतीला धोका निर्माण
झाला आहे.धर्मांध आणि जात्यांध
लोकांपासून लोकशाहीला आणि परिवर्तनवादी माणसांना धोका आहे.त्यामुळे महापुरुषांच्या वारसांनी
सावध राहून राष्ट्रप्रेम,परिवर्तनवादी मूल्ये रुजवित वाटचाल केली पाहिज
असे डॉ.हनुमंत भोपाळे यांनी सांगितले
यावेळी डॉ. हिमगिरे यांनी राष्ट्रप्रेमी
पिढी निर्माण करण्यासाठीनिर्भयपणे काम करणा-या माणसांची गरज आहे असे सांगितले.अध्यक्षीय समारंभाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ.हरिदास राठोडयांनी आमच्या संस्थेच्यामाध्यमातून सातत्यानेशैक्षणिक विकासाचा प्रयत्न सुरु आहे.
समाजाचा वैचारिक विकास झाला तरच देश वैभवशाली होणार म्हणूनवैचारिक मेजवानी देणारे कार्यक्रमआम्ही आयोजित करत
असतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहि:शाल व्याख्यानमालेचे प्रभारी प्राध्यापक डॉ. मदन गिरी यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची विद्यापीठ व महाविद्यालयाची भूमिका सविस्तर विशद केली.प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.डॉ. नाईक व्ही.टी.यांनी करून दिला.सूत्रसंचलन पृथ्वीराज काळेतर
आभार अविनाश बंडे
यांनी मानले.
कार्यक्रमास यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच प्रा.आशिष घाटे, प्रा.महेश कच्छवे, प्रा.गंगाधर भेदेकर,प्रा.सौ. अर्चना इंगोले,प्रा. बालाजी नवघरे, प्रा.सौ.मोहिनी शिवपूजे,प्रा.सुशील राठोड व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते