शिवरायांचा नवीन पुतळा पूर्वीच्याच जागेवर उभारण्याची मागणी करीता बेमुद्दत धरणेआंदोलन सुरु ;(नवीन जागेवरुन न.प प्रशासन विरोधात शिवप्रेमी जनतेत रोष,उपोषणाचा तीसरा दिवस)
किनवट (प्रतिनिधि)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या प्रक्रियेची संचिका देऊन पुतळा पूर्वीच्याच जागेवर बसविण्यात यावा या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समितीच्या वतीने शिवप्रेमी संतोष अडकीने यांच्या नेतृत्वाखाली दि 20 फेब्रुवारी रोजी पासुन नगरपालिका कार्यालयासमोर बेमुद्दत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
किनवट शहरातील मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नवीन जागेवरून नगरपालिका प्रशासना विरोधात जनतेत रोष निर्माण होत असून छत्रपती शिवरायांचा नियोजित पुतळा अन्य कोणत्याही ठिकाणी न बसविता पूर्वीच्या जागेवर उभारावा या मागणीसाठी आज किनवट नगरपालिकेसमोर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संघर्ष समितीच्या वतीने शिवप्रेमी संतोष अडकिने यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.नगरपालिकेने नवीन पुतळा उभारण्याच्या आराखड्यात पुतळ्याची जागा बदलली असून या संदर्भात पुतळ्याच्या प्रक्रियेची संचिका मागितली असता नगरपालिकेने ती संचिका देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.पूर्वीच्या जागे जवळील अतिक्रमण काढून व रस्ता मोठा करून पुतळा उभारावा अशी आमची मागणी असून न.प प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास यानंतर आक्रमक आंदोलन करणार असल्याचे संतोष आडकिने यांनी यावेळी सांगितले.या धरणे आंदोलनात अखिल भारतीय किसान कांग्रेस कमिटी,उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना,संभाजी ब्रिगेड किनवट,टीपू सुल्तान ब्रिगेड,अखिल भारतीय दिव्यांग कामगार संघटना,वंचित बहुजन आघाडी,विखे पाटिल कृषि परिषद यांच्यासह विविध पक्षाचे व सामाजिक संघटनेचे नेते व नागरिक सहभागी होत असून आज धरणे आंदोलनाचा तीसरा दिवस आहे.
मा.आ.प्रदीप नाईकांनी या धरणे आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि पुतळा नियोजित जागेवर एका कोपऱ्यात न बसवता जुन्या जागी किंवा जुनी नगरपालिका च्या प्रांगणात बसवावे,महाराज सर्वांचे आहेत सर्वांच्या दृष्टीने मध्य ठिकाणी महाराजांचा पुतळा व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.त्या बाबत नगरपालिका प्रशासक तथा तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्याशी फोन वर संपर्क ही साधला.