किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

माजी नगरसेविका मातोश्री गंगाबाई कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाशिवरात्री निमित्त मंगेश कदम मित्र मंडळातर्फे महाप्रसादाचे वाटप

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.19.महाशिवरात्री निमित्त माजी नगरसेविका कालवश गंगाबाई नारायणराव कदम यांच्या स्मृती प्रित्यर्थ मंगेश कदम मित्र मंडळातर्फे चैतन्यनगर येथील शिवमंदिरात भक्तांना महाप्रसाद व फराळाचे वाटप करण्यात आले.काही दिवसापूर्वीच माजी नगरसेविका गंगाबाई कदम यांचे दुःखद निधन झाले होते.ते तरोडा भागाच्या दोन वेळेस ग्रामपंचायत सदस्य,दोन वेळेस महानगरपालिकेच्या नगरसेविका, तीन वेळेस स्थायी समितीच्या सदस्य,तीन वेळेस महिला बालकल्याण समितीच्या सदस्य, होत्या.

या भागात विकासाची, जनहिताची अनेक कामे त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी केली आहेत. या भागात त्यांचा प्रचंड असा दांडगा जनसंपर्क होता. त्यामुळे त्यांच्या आठवणी स्मरणात रहाव्या यासाठी मंगेश कदम मित्र मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, यांनी महाशिवरात्रीच्या निमित्त शिव मंदिर चैतन्य नगर येथे भव्य महाप्रसादाचे, फराळाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी शिव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव पटणे, शिव मंदिराचे पुजारी, , माजी उपमहापौर सतिश देशमुख, मंगेश कदम,गोविंद देशमुख,संतोष मुळे, सखाराम तुपेकर,रामानंद तीर्थ विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कदम, राष्ट्रमाता शाळेचे सचिव अवधूतराव क्षीसागर, शासकीय गुत्तेदार अविनाश रावळकर,ॲड.धम्मपाल कदम माणिक देशमुख, सदानंद देशमुख,गोविंद तोरणे,महेद्र गायकवाड ,विजय डोनेकर,बंटी कदम,विक्की गायकवाड,धनंजय उमरीकर,अशोक दांडगे , प्रा. अशोक वाघमारे लातूर, गौतम सोनकांबळे,अमित लिंबेकर,सुमेध सोनकांबळे यांच्यासहित अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हजारो भाविक भक्त, महिला भगिनींनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

47 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.