किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मुखेड शिरुर रोडवर भिषण अपघात बसचालक गंभीर !* *मध्यधुंद कंटनेर चालक घटना स्थळावुन फरार, बस चालकांना उपचारासाठी नांदेड येथे हालविले

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.3.जिल्यातील मुखेड तालुक्यातील मौजे दबडे शिरूर मुखेड लातूर राज्य रस्त्यावरील मुखेड नजीक असलेल्या दबडे शिरूर पाटी जवळ बस व कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने एसटी चालक,वाहक यांच्या सह बस मधील दोन प्रवासी व इतर दोन असे एकुण सहा प्रवासी जखमी झाले दरम्यान कंटेनर चालक मद्य धुंद अवस्थेत असल्याचे जखमी प्रवाशांनी सांगितले ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली.दरम्यान
कंटेनर चालक फरार झाला आहे. सविस्तर वृत्त असे की मुखेड आगाराची बस क्रमांक एम .एच .20 बी.एल 22 28 ही कामजळगा या गावावरून प्रवाशांना घेऊन मुखेड कडे येत होती तर कंटेनर क्रमांक जी .जे 05 बी .एक्स 76 42 हा मुखेड कडून लातूरला जात होता कंटेनर चालकाने दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करण्याच्या नादात मुखेड कडे येणाऱ्या एसटीला दबडे शिरूर पाटील येथे समोरासमोर धडक दिली आहे. ही धडक एवढी जोराची होती की एसटीचा समोरचा भाग चकणाचूर झाला असून या घटनेत एसटी चालक रामदास कबीर व 40 वाहक सौ.एम एन पांढरे एसटी मधील प्रवासी रघुनाथ मस्कले वय 50 ,पुष्पाबाई बनसोडे वय 52 हे जखमी झाले दरम्यान कंटेनर चालकाने या अपघाता आधी रोडच्या कडेला थांबलेल्या बालाजी गणपतराव हाके वय 35 या पादचार्‍याला धडक दिली यात हाके हे गंभीर जखमी झाले.

दरम्यान कंटेनर मध्ये बसलेले प्रवासी देवीदास राठोड वय 55 राहणार सन्मुखवाडी हे प्रवासी ही गंभीर जखमी झाले दरम्यान ही घटना समजतात घटनास्थळी मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे,मुखेडचे पोलीस पाटील माधव टाकळे,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल माणिकराव घोगरे, महामंडळाचे कर्मचारी बालाजी नगरे,एस.टी सेनेचे बालाजी रिंदकवाले,नागोराव शेटवाड,उत्तम पवित्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना एसटी मधून बाहेर काढून मदतीला धावून येत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले दरम्यान एसटी चालक रामदास कबीर यांचे दोन्ही पाय अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल
अर्धा तास लागला गंभीर जखमी असलेले एसटी चालक रामदास कबीर यांचे दोन्ही पाय मोडल्याने मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

दरम्यान बाकी रुग्णावर मुखेड येथे उपचार चालू आहेत या अपघातात जखमी झालेल्या रुग्णावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधाकर तहाडे,डॉक्टर नरेंद्र गादेकर यांनी उपचार केले दरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथे धाव घेऊन आगारप्रमुख रा.सू बोधे, सुशील पत्की, बजरंग कल्याणी,भगवान रोडगे ,बालाजी नगरे,उपसरपंच शिवाजी राठोड,अँड.हाके,बालाजी शिंदे बिल्लाळीकर,विठ्ठलराव घोगरे प्रताप कोल्हे नागेश लोखंडे, उल्हास ईमडे यांनी जखमींंना मदत केली.दरम्यान ही घटना घडताच मद्यप्राशन केलेल्या कंटेनर चालक फरार झाला आहे.

129 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.