किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सीटू संलग्न शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा किनवट येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयावर मोर्चा

*शालेय पोषण आहार कामगारांना शाळा व शौच्यालय साफसफाई करायला लावल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार..कॉ. गंगाधर गायकवाड*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.31. जिल्यातील किनवट तालुक्यात शालेय पोषण आहार कामगारांचा मोर्चा किनवट येथील गट शिक्षणाधिकारी कार्यलयावर दि.३१ जानेवारी रोजी जुने शासकीय विश्रामगृह येथून काढण्यात आला.
अशोक स्तंभ येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सभा घेऊन विस्तार अधिकारी यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आली.

यावेळी संघटनेचे सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांनी आपल्या भाषणातून शाळेमध्ये खिचडी शिजवीणाऱ्या कामगारांच्या अनेक प्रश्नावर भाष्य करीत प्रशासनावर आणि शासनावर तीव्र शब्दात रोष व्यक्त केला.काही शाळांमध्ये शालेय आहार कामगारांना शाळेचा परिसर आणि स्वच्छतागृह साफसफाई करण्याचे काम बेकायदेशीररित्या लावले जात आहे.

आणि ज्या कामगारांनी विरोध केला त्यास शिक्षण समितीच्या तक्रारी नुसार कामावरून काढून टाकण्यात येईल अशा धमक्या देण्यात येत आहेत.

त्या सर्व मुख्याध्यापकांनी कायदा हातात घेऊ नये अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा दिला आहे.
किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी यावेळी मोर्चास संभोधित केले.

गोरगरीबांना शिक्षण उपलब्ध होऊ नये यासाठी राज्य व केंद्रातील सरकार कसोसिने प्रयत्न करीत असून कामगारांनी भक्कम एकजूट उभी करून लढा अजून तीव्र करावा लागेल असे आवाहन त्यांनी केले.सीटू जिल्हा कमिटी सदस्य काॅ.जनार्दन काळे यांनी मोर्चास संबोधित केले.शालेय पोषण आहार कामगरांना मानधनात वाढ करुण किमान वेतन देण्यात यावे,विना तक्रार कोणत्याही कामगारांना कामावरून कमी करण्यात येऊ नये,भाजीपाला,इंधन,तेलाचे बिल थेट कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे,शालेय पोषण आहार कामगारांना त्यांच्या कामाऐवजी इतर कामे लाऊ नयेत,मानधन, इंधन,भाजीपाला,खाद्य तेलाचे बिल दर महिण्याला दहा तारखेच्या आत अदा करण्यात यावे,कामगार विरोधी कायदे वापस घेण्यात यावेत इत्यादि मागण्या यावेळी मोर्चामध्ये करण्यात आल्या.पंधरासे रूपयांच्या अंत्यंत तुटपुंज्या मानधनावर शालेय पोषण आहार कामगार काम करीत असून कामगरांना कामाचा योग्य मोबदला मिळावा असे मत यावेळी आंदोलनाला संबोधित करत असतांना सीटूच्या नेत्यांनी व्यक्त केले.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी तालुका सचिव कॉ.दिलीप कोडापे,तालुका अध्यक्ष कॉ.दत्ता शहाने,सोनाबाई भांगे,बंडु चव्हाण, मडावीबाई, शौकत भाई आदींनी केले.

या मोर्चा मध्ये असंख्य शालेय पोषण आहार कामगार उपस्थित होते.प्रशासनाच्या वतीने मागण्या सदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन लेखी स्वरूपात कळविण्यात आले.
कामगार एकजूट झिंदाबाद,कामगारांना किमान वेतन लागू करा,कामगार विरोधी कायदे वापस घ्या अशा गगणभेदी घोषनांणी आंदोलनाचा समारोप करण्यात आला.अशी माहिती कॉ.गंगाधर गायकवाड
सरचिटणीस..महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटना (CITU)यांनी दिली आहे.

183 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.