विकास कामाच्या स्थगितीतून खा.चिखलीकरांनी मुख्यमंत्र्याना तोंडघशी पाडले – माजी आ. राजूरकर
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.25.तत्कालीन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शहरवासीयांना मूलभूत सुविधा उपलब्द व्हाव्यात यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ‘मूलभूत सुविधा’ या सदराखाली १५० कोटींचा निधी मंजूर करून घेतला होता. यातील बहुतांश कामांना प्रारंभ झाला होता यातून नांदेडकरांत आनंदाचे वातावरण होते मात्र नाट्यमय घडामोडीत राज्यात सरकार बदलले या परिस्थितीत खा.प्रताप चिखलीकरांनी या कामास गती देणे अपेक्षित असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती व स्थगितीचा अट्टहास यातून प्रारंभ झालेल्या या विकास कामास स्थगिती मिळवली होती.
शासनाच्या स्थगिती निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते.यावर दिलेल्या निकालात विद्यमान शासनाचा निर्णय बेकायदा,मनमानी व लहरी असल्याचे निरीक्षण नोंदवून निधी वितरणाच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. खा.प्रताप चिखलीकरांचा विकास कामास विरोध व अट्टहास यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तोंडघशी पाडण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष,माजी आ.अमरनाथ राजूरकर यांनी केला आहे.