थारा दिग्रस पुलावरील भगदाड सरपंचांच्या पुढाकारातुन भरले
किनवट/प्रतिनिधी:
तालुक्यातील दिग्रस – चंद्रपुर गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या थारा- दिग्रस रस्त्यावरील पुलाला भगदाड पडल्यामुळे मागिल अनेक दिवसा पासुन शाळकरी मुलींना घेवुन जाणारी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजने अंतर्गत मानव विकास मिशन योजनेतुन ये जा करनारी महामंडळाची बस, व खाजगी प्रवाशी वाहतुक करणारी वाहने बंद झाली होती, या बाबीची दख्खल घेवुन खासदार हेमंत पाटिल यांच्या पुढाकारातुन सरपंच उपसरपंचांनी पुढाकार घेत खड्डा बुजवुन रस्ता सुरळीत केला आहे. छत्रपती शिवाजी हायस्कूल, बेलोरी धानोरा शाळेत थारा, दिग्रस, डोगरगाव, चंद्रपूर, सावरी गावातील मुले- मुली शिक्षणासाठी जातात त्या विद्यार्थीनी बस चालु झाली समजताच. त्यांनी आनंद व्यक्त केली.
थारा – दिग्रस रस्त्यावरील पुल किरकोळ खचलेला असल्याने विद्यार्थीनींना शाळेत ने आन करणारी बस बंद होती, दररोजच तीन ते चार किमीचा प्रवास पायी करावा लागत असल्याने लहान मूला मुलींनी खासदार हेमंत पाटिल यांचे स्वीय सहाय्यक कर्तार साबळे यांचे व्हॉट्सॲप वर पुलाला खड्डे पडलेल्या, रस्त्याचे फोटो पाठवून मदतीची मागणी केली होती.
दिग्रस – चंद्रपूर येथे जाऊन विद्यार्थी, गावकरी यांची तात्काळ भेट घेतली. विद्यार्थीनींनी मांडलेली समस्या रास्त होती, रस्त्याचा प्रचंड त्रास व अडचण घेता तात्काळ रस्ता दुरूस्त करण्यासाठी पुढाकार घेवुन सुरळीत करण्यात आला आहे. तुर्तास गावकऱ्यांचे मुख्य रस्त्याने जाणे येणे अशक्य झाले आहे, परंतु अवजड मोठी वाहने या रस्त्याने जाणे येणे बंद आहेत. परीणामी नियमित कामे प्रभावित झाली आहेत.
या बाबत सबंधित अधिकारी विभागाशी संपर्क साधुन तात्काळ रस्ता दुरुस्त करून देण्याची केली. रस्त्याचे काम लवकर न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे.
यावेळी सरपंच श्रावण मिराशे, उपसरपंच कर्तार साबळे, ग्रामसेवक अनिल शिंदे, छत्रपती शिवाजी हायस्कूल, बेलोरी धानोराचे शिक्षक तुपेकर सर व विद्यार्थी गावकरी आणि स्थानिक उपस्थित होते.