किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बेताल वक्तव्यातून वारंवार होणारा महापुरुषांचा अवमान थांबणे आवश्‍यक – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

नांदेड दि 12 राज्यात गेल्या काही दिवसांपासून बेताल वक्तव्यातून वारंवार होणारा महापुरुषांचा अवमान थांबणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
शहरातील नवामोंढा येथील काँग्रेस कार्यालयात गुरुवार दि. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री डी. पी. सावंत, आ. मोहन हंबर्डे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रदेश सचिव ॲड. सुरेंद्र घोडजकर, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मीलनताई खतगावकर, माजी महापौर बलवंतसिंग गाडीवाले, जि.प.चे माजी समाज कल्याण सभापती ॲड. रामराव नाईक, माजी डीपीडीसी सदस्य अनिल मोरे, प्रवक्ते संतोष पांडागळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, नारायण श्रीमनवार आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना केवळ आशिर्वादच दिला नाही तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली. स्वामी विवेकानंद यांचे कार्य सुद्धा तरुण पीढीला प्रेरणादायी ठरणारे आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मीनलताई खतगावकर यांनी केले आहे. आभार गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी मानले. सूत्रसंचलन प्रा. संतोष देवराये यांनी केले.
यावेळी आनंद चव्हाण, विरेद्रसिंग गाडीवाले, प्रफुल सावंत, मुन्ना अब्बास, अर्पणा नेरलकर, विठ्ठल पावडे, करुणाताई जमदाडे, छायाताई कळसकर, गंगाधर बोरगावकर, नशीम जावेद खांन, पंढरीनाथ बोकारे, वसंत पवार, डॉ. विश्‍वास कदम, दिपक पावडे, शरफोद्दीन शेख, राज बहादुर कोत्तावार, बालाजी चव्हाण, नवीन राठोड, शशीकांत क्षीरसागर, राजकमलसिंग गाडीवाले, सोनाजी सरोदे, इजिं.हरजिंदरसिंग संधू , छत्रुग्घन गंड्रस, भुजंग कसबे, त्रिशुल पोहरे, संजय गायकवाड, आनंदा गायकवाड, भिमराव जमदाडे, शिवराज कांबळे, उमाकांत पवार, गोविंद तोरणे, जालंधर नरवाडे, सुभाष काटकांबळे, अरुणा पुरी, रजिया बेगम, शाहीन शमदानी, सुनंदा पाटील, जयश्री राठोड, प्रणिती भरणे, सुषमा थोरात, माधव दुधभाते, जगदीश शहाणे, प्रवीण कुपटीकर, संघरत्न कांबळे, आह्यादखांन पठाण, श्रीनिवास मुरक्या, दिगांबर वाघमारे, सुधाकर एडके, साईप्रसाद महाजन, मुनवर शेख, बाबासाहेब पाटील नागठाणेकर, बालाजी लोमटे, नितीन झरीकर, राहुल देशमुख, उमाकांत सरोदे, बाळकृष्ण शिंदे आदिंची उपस्थिती होती.

181 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.