किनवट नगरपालिका प्रशासकपदी किनवट च्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव; पद स्वीकारून विविध विभागाच्या प्रमुखासोबत घेतली बैठक
किनवट/प्रतिनिधी: किनवट नगरपालिका प्रशासक म्हणून किनवट च्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी दिनांक 9 जानेवारी रोजी किनवट नगर परिषदेच्या प्रशासक पद स्वीकारून विविध विभागाच्या प्रमुखासोबत बैठक घेतली व आवश्यक त्या सूचना दिल्या.
तहसीलदार डॉ.जाधव यांच्याकडे दीड वर्षापासून नगरपालिकेचे मुख्याधिकारी पदी प्रभारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा अनुभव पाहता ते चांगल्या प्रशासक प्रशासक म्हणून काम करतील अशी अपेक्षा जनतेकडून आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासून किनवट नगर परिषद चे मुख्याधिकारी पदी प्रभारी मुख्याधिकारी असल्यामुळे हे रिक्तपद त्वरित कायम मुख्याधिकारी म्हणून भरण्यात यावे अशी जनतेची मागणी आहे .
108 Views