दिव्यांग निधी तात्काळ वाटप करा अन्यथा रास्ता रोको ला सामोरे जा (पंचायत समिती चा भोंगळा कारभार)
किनवट ता. प्रतिनिधी (आनंद भालेराव)
पंचायत समिती अंतर्गत दिव्यांग निधी वाटपात निधी ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या गैरव्यवहारात जबाबदार ग्रामसेवकास पाठीशी घालणाऱ्या विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या संगनमताने दिव्यांगाची पिळवणूक होत आहे.
किनवट पंचायत समिती अंतर्गत 134 ग्रामपंचायती असून प्रत्येक गावांमध्ये कमी-जास्त प्रमाणात दिव्यांग व्यक्ती कायमस्वरूपी वास्तव्य करून राहतो अशा या दिव्यांगांना शासनस्तरावरून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन 2015 पासून चांगल्या पद्धतीने दर वर्षी 3 टक्के व 2018 पासून 5 टक्के निधी ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीचे उत्पन्न 14 वित्त आयोग व पेसा निधीतून वाटप अथवा खर्च करायचा आहे परंतु ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगाची नोंदणी असताना सुद्धा तालुक्यातील ग्रामसेवकांनी सन 2015 ते 2016 पासून तरतूद केली परंतु एकाही दिव्यांग व्यक्तीला निधी वाटप केला नाही यामुळे तालुक्यातील दिव्यांग झालेले असताना कोरोना काळामध्ये अखिल भारतीय अपंग कामगार संघटना यांचे सचिव राज माहुरकर यांनी योग्य पाठपुरावा करून तालुक्यातील दिव्यांग बांधवांना बऱ्याच प्रमाणात निधी मिळवून देण्यात सफल झाले परंतु वाटप झालेला निधी हा पूर्णपणे वाटप न झाल्याने व झालेल्या वाटपात अनियमितता व अपहार झाल्याचे दिसून आल्याने संघटनेच्यावतीने राज माहुरकर यांनी अनेक तक्रारी दाखल करून चौकशी लावल्यामुळे विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशीमध्ये एक तर्फे चौकशी करणे या कामी चौकशी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकास पाठीशी घालण्याचा जणूकाही विडाच उचलला आहे अशा पद्धतीने चौकशी करून एक प्रकारे दिव्यांगा वर अन्याय करत असल्याचे सुद्धा दिसून येते अशा या चौकशी अधिकाऱ्याविरुद्ध दिव्यांगा मध्ये कमालीचा रोष असून दिव्यांग बांधव गाव तिथे रस्ता रोको करणार असल्याचे संघटनेचे सचिव राज माहुरकर यांनी आपले मत व्यक्त केले.