अखिल भारतीय आंतर विद्यापीठस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुशांत प्रशांत ठमके यांनी मिळविले रौप्यपदक
किनवट : गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर येथे शुक्रवारी (ता.6) संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत येथील विद्यार्थी सुशांत प्रशांत ठमके यांनी रौप्यपदक मिळविल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
त्याने मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूल, गोकुंदा / कोठारी ( चि) येथेपहिली ते दहावी , महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे अकरावी ते बारावी पर्यंत शिक्षण घेतले असून त्यांनंतर महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरीचे घटक असलेल्या कृषि महाविद्यालय, पुणे येथून बी.एस्सी. (ऑनर ) ही पदवी घेतली असून सध्या तो नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. यामुळे स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धेत तो सहभागी झाला होता.
गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर येथे झालेल्या अखिल भारतीय स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक मिळविले. रोहतकचे कोच यांनी त्यास हे पदक प्रदान केले. दोनवेळा शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे त्याचे मार्गदर्शक आहेत. तायक्वांदो हा खेळ सुरु झाल्यापासून तसेच स्वारातिम विद्यापीठ स्थापने पासून स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडला मिळालेले हे राष्ट्रीय स्तरावरील पहिलेच पदक आहे.
या यशामागे माझे कोच व मित्र शाहीद, कानिफ , कबीर, गौरव हे असून आमचे व्यवस्थापक डॉ. मोहशीन पठाण यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून मोलाची साथ केली आहे. असे त्याने सांगितले.
विद्यार्थी दशेतच भारतीय आयुर्विमा महामंडळाचे एमडीआरटी मेंबर झालेल्या सुशांत ठमके यांनी अमृतसर येथे अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ ताइक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळविले. त्यामुळे तो यूपीएससी साठी राखीव क्रीडा कोट्यासाठी पात्र ठरला आहे. आता सराव शिबिरानंतर तो आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी इव्हेंट्ससाठी निवडू शकतो आणि सुवर्णपदक विजेत्याशी त्याची अंतिम लढत होईल. किनवट ह्या आदिवासी, डोंगरी तालुक्यातूनच नव्हे मराठवाड्यातून या स्पर्धेतून यशाचे हे शिखर गाठणारा तो अद्विक आहे.