किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

ऑनलाईन जुगार, मटका,चालवणाऱ्यांनी जिल्यात धरले बाळास* बादशहा खाऊ देईना…..आणी …राणी झोपू देईना* *नांदेड जिल्ह्यात झुगाराच्या नादी लागून तरुणाई बरबाद

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.6.जिल्ह्यात व शहरात गेल्या अनेक दिवसापासुन खुलेआम चालु असलेला कल्याण- मुंबई मटक्याने शहरा शहरात मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला आहे.

कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्याच्या नादात शहरातील तरूणवर्ग या वाममार्गाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला असल्याचे दिसुन येत आहे.

या अवैध झुगार मटक्याच्या नादी लागुन आनेकांचे संसार उघड्यावर येवुन पडल्याचे चित्र शहरात ठीक ठीकाणी पहायला मिळत आहे.तर ऑनलाईन जुगार,मटका बुकी मालक व क्लब मालक मात्र गबर झाल्याचेही चित्र पहाव
यास मिळत आहे.

अँप मार्फत वजिराबाद येथून पवन नावाचा वेक्ती मराठवाड्यात जुगार चालवितो असी माहिती असून त्यांचे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अनेक एजंट आहेत अशी माहिती आहे त्यांच्या कडे लुडो,तीन पत्ती,रम्मी,असे अनेक अँप तयार आहेत.

बादशहा खाऊ देईना…..आणी …राणी झोपू देईना अशी स्थिती सध्या शहरातील झुगाराच्या नादी लागुन व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या अनेक तरूण व युवक वर्गाची झालेली जागो जागी पहायला मिळत आहे.

या मटका झुगाराच्या नादी लागुन अनेकांनी आपले अख्खे प्रपंच उधवस्त करून घेतले आसुन, कर्जबाजारी होऊन दारू,गांजा, चरस या सारख्या व्यसनांच्या आहारी गेले आहेत.शहरातील बहुतांश युवक व तरून वर्ग बरबादीकडे वळताना दिसत आहे.तर झुगार,मटक्याच्या नादात कर्जबाजारी होउन कित्तेक जणांवर गाव सोडून जाण्याची पाळी आली आहे.

ओपन खाऊ देईना……क्लोज झोपू देईना….अशी अवस्था सध्या नांदेड जिल्ह्यात व शहरातील झुगार मटक्याच्या आहारी गेलेल्या सर्वसामान्य व विशेष करून तरूण युवा वर्गाची झाली आसुन कर्जबाजारी पणामुळे आनेकांचे प्रपंच उधवस्त झाल्याचे चीत्र आहे.जुगार क्लब मालक व मटका बुकी मालक मालामाल, तर सर्वसामान्य व तरूण युवक मटक्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी होऊन बेहाल झाले असल्याची अवस्था सर्वत्र पहायला मिळत आहे.

या झुगार मटक्याला खुले आम चालविण्यासाठी अभय कोणाचे…? हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.जर जनतेचे रक्षकच भक्षक बनायला लागले तर सर्वसामान्य जनतेने विश्वास ठेवायचा कोणावर…? असा प्रश्न सध्या सामान्य नागरिकांना पडला आहे. कुंपणच शेत खात असल्याने याबाबत तक्रार करायची कुणाकडे..? हाच प्रश्न सर्वसामान्य नागरीकाला सध्या सतावत आहे.

शहरातील पानटपरी,खासगी मालकीचे गाळे,नगरपरिषदेच्या मालकीचे गाळे,हाॅटेल, व इतर ठिकाणी खुलेआम मटका बुकी चालू आहेत.तर शहरातील आनेक ठीकाणी मध्यवस्तीत झुगाराचे क्लब दिवस रात्र चालु आहेत.

यामध्ये दिवसाला लाखो रूपयांची अवैद्य उलाढाल होत आहे.परंतु हे अवैद्य व्यवसाय नांदेड जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक पोलिसांच्या नजरेस अजिबात पडत नाहीत. व त्याकडे त्यांचे लक्ष जात नाही.एखाद्याने या विषयी तक्रार केली तर त्यालाच उलट्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने सर्वसामान्य नागरीक या विषयापासुन चार हात लांब राहणेच पसंद करत आहेत.

अवैध धंद्याविरोधात कारवाईबाबत पोलीस खात्याची भुमिका संशयास्पद असल्याने जनतेने भरवसा ठेवायचा कोणावर..? असा सुर सध्या नागरिकांमधून निघत आहे.

पोलिसांनी मनावर घेतल्यास एक तासात नांदेड शहरातील सर्व अवैद्य धंदे हद्दपार होऊ शकतील. परंतु कडक कारवाईची भुमिका पोलिस खात्याने स्विकारने गरजेचे आहे.

त्या विषयी पोलिसखाते ठाम असणे गरजेचे आहे.परंतु पोलिस खात्याकडुन अशा अवैध धंदेवाल्यावर कारवाई का केली जात नाही…? पोलिस खाते सुद्धा या दोन नंबर मटका, झुगार क्लबवाल्यांना घाबरत आहे की काय..? अशी चर्चा सध्या गावभर रंगत आसुन नक्की कुणाच्या आशिर्वादाने हे काळे धंदे सुरू आहेत याचा उलगडा जनतेला होणे गरजेचे आहे.

या अवैध धंद्यामुळे शहरातील गुंडागर्दी पुन्हा मोठ्या प्रमाणात शहरात फोफावण्यास सुरूवात झालेली आहे.शहरातील वाढती गुंडागर्दी ही शहरवासीयांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार असल्याने अशा या अवैध व्यवसायाला खुलेआम पाठबळ कुणाचे…? कुणाच्या आशिर्वादाने हे अवैध धंदे नांदेड जिल्ह्यात व शहरात खुलेआम व राजरोसपपणे चालु आहेत…? यांच्या मागचे बोलविते धणी कोण आहेत…? याची सखोल चौकशी वरीष्ठ स्तरावरून होणे गरजेचे असल्याने स्थानिक पोलिसांना अंधारात ठेवुन नांदेड उपविभागीय पोलास अधीकारी कार्यालय व ईतर किंवा पोलिस अधिक्षक कार्यालय, नांदेड यांचे पथकामार्फत कारवाईचा फार्स आवळल्यास नांदेड जिल्ह्यात व शहरातील अवैध व्यवसायाला कायमचा लगाम बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या अवैध व्यवसायाला मोठा राजाश्रय असल्याशिवाय हे असे धंदे शहरात फोफावणे शक्य नाही.

आपली राजकीय पोळी भाजुन घेण्यासाठीच काही राजकीय पुढारी चार दोन गाव गुंडाना हाताशी धरून आनेकांना वाम मार्गाला लावण्याचे काम करत असून अशा राजकीय पुढार्‍यांवर पोलिसांचा कायमचा अंकुश असणे गरजेचे आहे.जेणे करून नांदेड जिल्ह्यात व गावात शांतता व सुव्यवस्था राखणे शक्य होईल. व शहरामध्ये शांततामय वातावरण राहील.आणी शहरातील युवा वर्ग अवैवाममार्गाला लागण्यापेक्षा चांगल्या मार्गाने व्यवसायाच्या नादी लागेल.व गावात शांतता नांदेल एवढीच जणसामान्य ची अपेक्षा आहे.

142 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.