किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

शिव मंदिर समोरील डी.पी. हलविण्यासाठी महावितरण ला मुहुर्त सापडेना.

किनवट तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील शिरमेटी गावालगत आसलेल्या शिव मंदिर जवळील डी.पी. स्थलांतरसाठी गावकऱ्यांनी निवेदन देऊन तब्बल एक वर्ष ओलांडली परंतु अद्याप कोणतीही प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने गावकरी संतापले आहेत.
सविस्तर वृत असे की,

शिरमेटी येथील गावकर्‍यानी एक वर्षा पूर्वी दिनांक ०८/१२/२०२१ रोजी महावितरण उपविभाग कार्यालय किनवट यांच्याकडे निवेदनाव्दारे मंदिराचे जीर्णोद्वार करण्यासाठी मंदिराच्या जागेतील डी.पी. आडथळा होत असल्याने डी.पि. आहे त्या जागेवरून मंदिराच्या समोरील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस स्थलांतर करून द्यावी. अशी विनंती केली होती.
परंतु वर्ष होऊन गेले अद्याप महावितरण अधिकारी कोणतेच निर्णय न घेता टाळाटाळ करीत आहे.
कार्यकारी अधिकारी भोकर यांच्याशी संपर्क साधला असता आमच्या पर्यंत आसा एकही अहवाल आलेला नाही आल्यास आम्ही लगेच त्यांना पुढील प्रक्रिया सुरू करण्यास कळवू असे मत मांडले.
कनिष्ठ अभियंताशी संपर्क साधला असता आम्ही अहवाल पाठवलेला आहे, आद्याप त्यांच्या कडून कोणतीही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही झाली की लगेच काम चालू करू अशी उत्तरे मिळत आहेत.
आश्यात न्याय मागायचा तरी कुणाला असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
गावाच्या विद्युत पुरवठ्याकरिता दुसरी डी.पी. असताना ह्या डी.पी. ची तेवढी आवश्यकता काय आणि त्यात फक्त स्थलांतर करण्याचे निवेदन आम्ही दिले असताना त्यातही एवढा आळशी पना का? आसा देखील सवाल ग्रामस्थ करत आहेत.
या भानगडीत एक वर्ष पूर्ण झाल्याने गावकरी रोष व्यक्त करीत आहेत.
एखाद्याचा बळी गेला म्हणजे यांचे डोळे उघडतील का आसा देखील सवाल गावकऱ्यातून निर्माण केला जात आहे.
आमच्या प्रतिनिधीशी पुढं बोलताना गावकऱ्यांनी म्हंटले आहे की, आमचे काम लवकरात लवकर न झाल्यास आम्ही उप कार्यकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करू असे गावकऱ्यांनी सांगितले.

231 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.