किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

दिव्यांगानी संघटिपणे संघर्ष केल्यामुळे देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय निर्मिती केली पण या मंत्रालयात सेवक ते वरीष्ठ कर्मचारी ,प्रतिनिधी दिव्यांगच असल्यास दिव्यांगाचा विकास होईल – डाकोरे पाटिल

माहूर/प्रतिनिधी,
माहुर येथे ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी माहुर शाखेच्या बोर्डाचे अनावरण दिव्यांगाचा मेळावा दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्टृ शाखा माहुर बोर्डाचे अनावरण जिजखमाता चौक येथे दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे,माहुरचे नगरअध्यक्ष फेरोजभाई दोसानी, नायब तहसिलदार, मा.आमदार केरामचे प्रतिनिधी,का
कॉग्रेसचे प.स.माजि सभापती किसनकाका राठोड,गोरसेंनेचे जिल्हा सचिव अर्जुन पवार, मुख्यकार्यकारी अधिकारी, भाजपाचे जेष्ठ नेतेअनिलभाऊ वाघमारे, दिव्यांग सं.सर्व कार्यकारणी अनेक मान्यवराच्या ऊपस्थित बोर्डाचे अनावरण करून डॉ.बाबासाहेब अंबेडकर चौकाच्या बोर्डाला पुष्पहार घालुन पेढे वाटुन फटाके फोडुन उत्साह,आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
कपिलेश्वर धर्मशाळा माहुर येथे दिव्यांगाचा मेळ्याव्यात वरील मान्यवराच्या हस्ते दिप प्राजलन करून मान्यवराचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,तर ऊदघाटक माहुरचे नगर अध्यक्ष फेरोजभाई दोसानी,प्रमुख पाहुणे नायब तहसिलदार माहुर, मुख्यकार्यकारी माहुर माजी सभापती किसनकाका राठोड,जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,जि.ऊप अध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार पत्रकार मॉडम,सरपचअनेक मान्यवर दिव्यांग बांधवासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते दिव्यांगाचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंलन सरपंच अर्जुन पवार,यांनी केले
प्रस्ताविक मार्गदर्शन ता अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण यांनी कार्यक्रमाचा ऊध्देश सर्व बांधवाना दिव्यांग जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या
ऊदघाटक माहुरचे नगर अध्यक्ष फेरोजभाई दोसानी यांनी दिव्यांग जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपणास संघटित करण्यासाठी डाकोरे साहेबानी प्रयत्न केल्यामुळे आज आपल्या संघर्षामुळे मंत्रालय करण्यात आले या सरकारचे मी आभार व्यक्त करतै नुसते मंत्रालय झाल्याने प्रश्न सुटत नसतात म्हणुन आपण सर्वानी चंपतराव डाकोरे सोबत लाढाईत सामिल व्हावे गरज पडल्यास मला आवाज द्या मी आपल्या सोबत आहे नगरपंचायतचा दिव्यांग निधी,घरकुल चे वाटप केले आहे आपल्या समस्या मी सोडविण वरीष्ठ पातळिवर पक्षासमोर मांडुन न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे अश्वासन दिले
माजी सभापती राठोड सरानी जागतिक दिनाच्या शूभेच्छा देऊन माहुर आदिवाशी डोगराळ भागातिल दिव्यांगाना न्याय मिळावा म्हणुन मा. चंपतराव डाकोरे पाटिल माहुर तालुक्यात दरमहा मिटिंग ,निवेदन पहिला मोर्चा दंवडी मोर्च्या काढला होता त्यावेळी मी सभापती होतो त्यावेळी गटविकास अधिकारी यांच्या सोबत चर्चा करुन दिव्याग निधी दिला व प्रत्येक वेळि मी डाकोरे पाटिल यांच्या चळवळी सोबत आहे पुढे पण दिनदुबळ्याना सहकार्य करण्याचे अश्वासन दिले
यावेळी पत्रकार पदमा गिरे मॅडम ,प्रहार संघटनेचे शिवचरण दिव्यांग स जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले ईत्यादीचे मार्गदर्शन झाले
अध्यक्षिय मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणुन शासनाने अनेक वेळा कायदे,शासन आदेश देऊन न्याय मिळत नसल्यामुळे दिव्यांग,वृध्द, निराधार,मित्र मंडळ महाराष्टृ या संघटनेच्या वतीने सर्वानी संघटित करण्याचा प्रयत्न केला आपण सर्वानी मला सहकार्य केल्यामुळे आज आपणास कुठेतरी न्याय मिळत आहे,गावपातळीवर निधी,सवलती,एवढेच नव्हे तर आपल्या व्यंगावर बोलणे सुध्दा बंद झाले ते शासनाने दिव्यांग कायदा २०१६ च्या कलम ९२,९३ प्रमाणे आपल्या शरीराच्या व्यंगावर बोलले फार मोठा गुन्हा नोंद होतो त्यांची माहिती आपणास व्हावी म्हणुन गाव तिथे दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे अनावर नांदेड जिल्यात १८१ व्या बोर्ड शाखेचे अनावरण मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
देशातील पहिले दिव्यांग मंत्रालयाची घोषणा आपल्या सर्वाच्या संघटित संघर्षामुळे व आपले दिव्यांगाचे कैवारी माजी मंत्री बच्चुभाऊ कडुमुळेच आपणास मंत्रालय झाले बच्चुभाऊ गुहाटिला गेले नसते तर मंत्रालय मिळाले नसते सतेत आपला प्रतिनिधी असल्याशिवाय
न्याय मिळत नाहि या शासनाच्या सर्व मंत्रीमंडाचे ,बच्चुभाऊचे जाहिर आभार व छोटिशी विंनती कि या मंत्रालयात सेवक ते वरीष्ठ अधिकारी,व मंत्री पण दिव्यांगासाठी राखिव ठेऊन भर्ती केल्यास खऱ्या अर्थाने दिव्यांगाना न्याय मिळेल.
कारण या म्हनीप्रमाणे *पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्यांच्या वंशा तेंव्हाची कळे*
त्या दिव्यांगाना काय दु:ख होते त्याच्या वेदना सर्व सामान्याना कसे कळतिल एखादा हजारात बच्चुभाऊ कडु सारखा असतो पण एखाद्याने संघर्ष केल्यास न्याय मिळत नसतो म्हणुन सर्वानी संघटितपणे संघर्ष करावा असे अव्हाहण अध्यक्षिय समारोपात डाकोरे पाटिल यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार ता.उप अध्यक्ष ऊमेश भगत यांनी केले
या कार्यक्रमास किनवट ता अध्यक्ष अंकुश राठोड,हदगाव सचिव चव्हाण,धनगरे,अर्धापुर बबन पाताळे, अनिस मिर्झा
ता् अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण ,ता ऊपअध्यक्ष ऊमेश भगत,ता. सचिव अरविंद राठोड,शहर अध्यक्ष दादाराव कांबळे, महिला अध्यक्ष बबिता मारबते,म.सचिव वनिता पेटकुले नरवाडे सागर नरसिमलु, सुखळकर,रेवा राठोड ईत्यादीने केले असे प्रसिध्दी पत्रक दिले

74 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.