दि.०४ डिसेंबर २०२२ रोजी ५३ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात तहसील कार्यालयात मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न
किनवट : दि.०४ डिसेंबर २०२२ रोजी ५३ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकी संदर्भात तहसील कार्यालयात मतदान अधिकारी व कर्मचारी याना प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या सत्रात घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात एकुण ८८५ कर्मचान्यांनी आपला सहभाग नोंदविला. प्रशिक्षणाचे एकुण तीन सत्र पार पडणार आहेत. यावेव्गी तहसीलदार डॉ.मृणाल जाधव, नायब तहसीलदार मो .रफीक, नितीन शिंदे, तलाठी सचिन भालेराव, मास्टर ट्रेनर मल्लिकार्जुन आदी उपस्थित होते. मास्टर ट्रेनर उत्तम कानिदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . (छाया-साजीद बडगुजर)
98 Views