उद्या 25 रोजी जिवती जि.चंद्रपूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा अनावरण सोहळयाचे शानदार आयोजन
किनवट/प्रतिनिधी: तालुका जिवती जि.चंद्रपूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा दि.25 सप्टेंबर 2022 रोजी रविवारी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या जवळ जिवती येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री विजयभाऊ वडेट्टीवार( माजी मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य )यांच्या हस्ते संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेशदादा बागवे (माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र) हे राहणारे आहे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री बाळू धानोरकर (खासदार चंद्रपूर-वणी लोकसभा क्षेत्र), सुभाषभाऊ धोटे (आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र), अरुणभाऊ धोटे (मा.अध्यक्ष नगरपरिषद राजुरा),मा.डॉ. अंकुश गोतावळे (उपनगराध्यक्ष नगरपंचायत जिवती), मा. श्री जी.एस. कांबळे( जेष्ठ विचारवंत), मा. श्री उदल कांबळे (आदिलाबाद) हे उपस्थित राहणार आहेत.
सदरील कार्यक्रमात सकाळी 10.30 वाजता मोटर रॅली पंचशील ध्वज ते अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत सकाळी 11 वाजता प्रभात फेरी पंचशील व्यवस्थे अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत दुपारी 12 वाजता पुतळ्याचे अनावरण व मार्गदर्शन संपन्न होणार आहे.मार्गदर्शनाच्या कार्यक्रमानंतर स्टार प्रवाह चॅनल वरील “मी होणार सुपरस्टार”फ्रेम कु.प्रांजल बोधक हीच गायनाचा कार्यक्रम राहील.
या कार्यक्रमास तालुक्यातील जास्तीतजास्त समाज बांधव व अण्णाभाऊ साठे प्रेमी जनतेला सहभागी व्हावे.असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक समितीचे अध्यक्ष प्रा.सुग्रीव गोतावळे, उपाध्यक्ष देविदास कांबळे,सचिव दत्ता तोगरे,सहसचिव गणेश वाघमारे, कोषाध्यक्ष दत्ता गायकवाड,सहकोषाध्यक्ष केशव भालेराव ,सल्लागार व सदस्य यांनी केले आहे.