परभणीत मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर रक्तरंजित निषेध मोर्चा
परभणी /दि.05सप्टेंबर.
गोविंद कांबळे जि.परभणी व जनार्धन कसारे जि.औरंगाबाद या मातंग समाज बंधूवर खूनी हल्ला करून जिवे मारणा-या व तमाम महाराष्ट्रात मातंग समाज बंधू -भगीनीवर हल्ले बलात्कार करणा-या जातीयवादी गुंडाना फाशी द्या. पिडीत कुटुंबांना रु.50-50 लाखांची आर्थिक मदत करा.महा नगरपालिका हद्दीत पक्के घर देऊन त्यांचे पूनर्वसन करा. असे जिल्ह्याधिकारी परभणी यांना निवेदन देऊन घटनेचा तिव्र निषेध नोंदवण्यात आला.
मोर्चाच्या जाहीर सभेचे प्रास्ताविक
लालसेनेचे संस्थापक अध्यक्ष गणपत भिसे यांनी केले. तर संबोधन सभेची सुरूवात अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन म.रा.चे संस्थापक अध्यक्ष मा.सतिशजी कावडे यांच्या भाषणाने सुरूवात झाली. त्यानंतर राधाजी शेळके, मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डाॅ.मिलिंद आव्हाड, मानवहित लोकशाही पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे, लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे,मछिंद्र गवाले,अशोकराव उफाडे यांनी मार्गदर्शन केले.
सदरील मोर्चास अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन म.रा. चे राज्य उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार, नांदेड जिल्हाध्यक्ष शिवाजी नूरुंदे,जिल्हा संघटक नागेश तादलापुरकर यांच्यासह नांदेड,परभणी व हिंगोली जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना पदाधिकारी,कार्यकर्ते समाज बंधू भगीनी हाजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चा शहरातील मूख्य रस्ता व बाजार पेठ,स्टेडियम मार्गे जिल्ह्याधिकारी कार्यालय परभणी येथे अगदी शांतता पुर्ण पोहचला. जिल्ह्याधिकारी परभणी यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.