किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी – मल्हार युवा मंच युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगिर

किनवट :धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी तसेच अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याच्या मागणीसाठी खा विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज संघर्ष समिती तसेच जय मल्हार युवा मंचच्या वतीने युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगिर यांनी 22 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे विधानभवनात भेट घेऊन निवेदन सादर केले यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती कुंडगीर यांनी दिली आहे

राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणासह अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत समाजाच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लागाव्यात तसेच अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी नगर असे नाव द्यावे यासाठी राज्यसभेचे खा विकास जी महात्मे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज संघर्ष समिती व जय मल्हार युवा मंचच्या वतीने युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी 22 ऑगस्ट 2022 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे विधान भवनात भेट घेऊन निवेदन सादर केले निवेदनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, समाजाच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी नगर असे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती कुंडगीर यांनी दिली. या प्रसंगी धनगर समाज संघर्ष समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष आनंद बनसोड, बीड जिल्हाध्यक्ष बाबुलाल ढोरमारे यांच्यासह जय मल्हार युवा मंचचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

238 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.