किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

आयटीआय येथे 22 ट्रेडसाठी 724 जागा उपलब्ध,विविध ट्रेडसाठी प्रवेश प्रक्रीया सुरु

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.23.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने आयटीआय प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.विद्यार्थ्यांनी विविध ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.प्रवेश अर्ज भरुन फॉर्म निश्चिती करणे,प्रवेश फॉर्म त्रुटी सुधारणे, प्रवेश फिस भरणे या बाबी प्रवेश प्रक्रियेत आहेत. आयटीआय येथे 22 ट्रेडसाठी 724 जागा उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांनी https//.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन प्राचार्य एम.एस.बिरादार यांनी केले आहे.

प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवारांने अर्जातील माहिती दाव्यांचा पृष्ठयर्थ आवश्यक मुळ दस्तावेज,कागदपत्रे,कागदांच्या छायांकित प्रतीचा एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पडताळणीसाठी वेळापत्रकानुसार दाखल करावेत. उमेदवारांनी व पालकांनी ऑनलाईन देण्यात आलेली माहिती, प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करुनच प्रवेश अर्ज सादर करावेत.फिटर/पेंटर जनरल/बेसिक कॉस्मॅटोलॉजी/सुईंग टेक्नॉलॉजी/शिट मेटल/टुल अॅड डायमेकर/टर्नर/वेल्डर/वायरमन/फॉड्रीमॅन/मशिनीस्ट/ट्रॅक्टर मेकॅनिक/ईलेक्ट्रशीयन/ड्राफ्सटमन सिव्हिल इ. ट्रेड आहेत.

प्राचार्य एम.एस.बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश समिती प्रमुख सुभाष परघणे, उपप्रमुख रविंद्र वानखेडे,केदार गिरीश,संजीवनी जाधव, मांजरमकर,गरूडकर,प्रकाश बानाटे हे काम पाहत आहेत असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

120 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.