किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नांदेड – मुंबई, नांदेड – दिल्ली विमानसेवा लवकरच सुरु होणार -खासदार हेमंत पाटील; शिष्टमंडळाच्या मागणीला केंद्रिय विमान वाहतूक मंत्री यांच्या कडून सकारात्मक प्रतिसाद

हिंगोली, ता. २१ – छत्रपती संभाजीनगर नंतर नांदेड विमानतळ हे मराठवाड्यातील सर्व सोयीयुक्त असे डोमेस्टीक एअरपोर्ट आहे. शिवाय नांदेड हे शीख धर्मियांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते सोबतच हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तिर्थक्षेत्र, संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले नर्सी नामदेव, माहुरगड, परळीचे वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदीर अशी तिर्थक्षेत्र अगदी काही तासाच्या अंतरावर आहेत. त्यामुळे नांदेड -मुंबई, नांदेड – दिल्ली आणि नांदेड -पुणे अशी विमानसेवा तातडीने सुरू करण्याची केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादीत्य सिंधिया यांच्याकडे खासदार हेमंत पाटील व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह खासदारांच्या शिष्टमंडळाने मागणी केली होती त्यानंतर, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादीत्य सिंधिया यांनी नांदेड – मुंबई, नांदेड – दिल्ली हि विमानसेवा लवकरच सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली .
नांदेड शहर झपाट्याने विकसित होत आहे . त्यामुळे नांदेडला राष्ट्रीय पातळीवर जोडण्यासाठी ही विमान सेवा अत्यावश्यक ठरणारी आहे. नांदेड -पुणे, नांदेड -दिल्ली आणि , नांदेड – मुंबई या तिन्ही मार्गावर नवीन विमानसेवा सुरू करावी अशी मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील व नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,यांच्या शिष्टमंडळाने केली आहे यावेळी त्यांच्यासमवेत बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे,जहीराबादचे खासदार भीमराव पाटील, नाशिक खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन केली होती.नांदेडच्या उद्योग व्यवसायाच्या नवीन वाढीसाठीही विमानसेवा अत्यावश्यक ठरणारी आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे हिंगोली , नांदेड आणि मराठवाड्याला अनेक रेल्वे सेवांचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मराठवाड्याच्या सर्वागीण विकासासाठी आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांचे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. आता विमानसेवा अधिकाधिक दर्जेदार व्हावे आणि हिंगोली व नांदेडकरांना मुंबई, पुणे, दिल्ली येथे तातडीने पोहोचता यावे, आपली कामे नियोजित वेळेत करता यावीत या अनुषंगाने या विमानसेवा प्राधान्याने सुरू कराव्यात अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या शिष्टमंडळासह केली आहे. इतकेच नाहीतर एमबीबीएस आणि आयआयटीचे नांदेड हे प्रवेशद्वार ठरत असल्याने येथे खाजगी शिकवणीसाठी मुंबई पुणे यासह दिल्ली आणि देशातील विविध कानाकोपऱ्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहेत त्यामुळे शैक्षणिक हब ठरत असलेल्या नांदेडला विमानसेवेने जोडणे अत्यावश्यक होत आहे .त्यामुळे नांदेड येथे तातडीने ह्या तिन्ही मार्गावरील विमानसेवा सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास दिला आहे. त्यामुळे लवकरच हिंगोली आणि नांदेडकरांना मुंबई, पुणे आणि दिल्ली येथे विमानसेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे.

49 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.