जिओ,आयडिया, व्होडाफोन सह सर्व कंपन्यांचे नेटवर्कच “नॉट रिचेबल.!
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.18.जिल्यातील सर्वच तालुक्यात गेली आठ दिवसांपासून सतत चालू असलेल्या पावसाने तालुका व परिसरातील देशभर नामांकित असलेल्या जिओ, आयडिया,व्होडाफोन,एअरटेल या कंपन्यांचे नेटवर्क गायब असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.गत आठ दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस चालू असून जनजीवन विस्कळित झाले आहे.अतिवृष्टीमुळे शेती, वाहतूक सेवा आदी क्षेत्रांवर परिणाम झालेला येत आहे.
सतत पाऊस चालू असल्याने नागरिकांचे घरातून बाहेर पडणे ही अवघड झाले आहे.अशा परिस्थितीत घरातच अडकून पडलेल्या नागरिकांना महावितरणचाही दिलासा नसून पावसामुळे अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्याने टी.व्ही.सारखे करमणुकीची साधने पण वापरणे कठीण होऊन बसले असून त्यात आता भर घातली ती नेटवर्क कंपन्यांनी.जिओ,आयडिया, व्होडाफोन,एअरटेल आदी टेलिकॉम कंपन्यांचे नेटवर्क गायब असल्यामुळे नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
एखाद्या वेळेस नेटवर्क आलेच तर इंटरनेट चालत नाही, अशी परिस्थिती सध्या धर्माबाद तालुका व परिसरात आहे.या सर्व कंपन्यांनी आपापल्या दरात साधारणतः २० टक्के दरवाढ केली आहे. मात्र त्याप्रमाणात सक्षम सेवा पुरविण्यात या कंपन्या असमर्थ ठरत आहेत. मागील एक दोन महिन्यांपासून ह्या समस्या बळावत असून आता तर कंपन्यांनी हद्दच पार केली आहे.नेटर्वक अभावी अनेकांच्या दिनचर्येवर परिणाम होत आहे.
ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.