किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पूरग्रस्त भागातील नागरिकांची आरोग्य बिघडू नये म्हणून दिनांक 15 जुलै पासून मोफत फिरता दवाखाना सुरू

किनवट/प्रतिनिधी: किनवट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त भागातील नागरिकांची आरोग्य बिघडू नये म्हणून दिनांक 15 जुलै पासून मोफत फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्यात लागणारे सर्व प्रकारच्या औषधे हे स्वतः पुरविणार आहेत.
गेल्या ५ दिवसापासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. यामुळे अनेक प्रकारचे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. याची दखल घेत नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या पुढाकारातून नगर परिषद किनवट व साने गुरुजी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पूरबाधित गंगानगर, नालागड्डा, रामनगर या भागातील नागरिकांना डेंगू, मलेरिया व साथीच्या आजारा पासून बचाव होण्यासाठी फिरते दवाखाने व त्यासोबत नागरिकांना औषध पुरवठा करण्यात येणार आहे. गंगानगर भागात फिरत्या दवाखान्याची सुरवात करण्यात आली असून या वेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष व्यकंट नेम्मानिवार, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अभय महाजन, भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेम्मानिवार, बालाजी धोत्रे, स्वच्छता दूत बाळकृष्ण कदम आदी उपस्थित होते. या फिरत्या दवाखान्यामध्ये ३ डॉक्टर ४ परिचारिका व १ सेवक अशा ८ जणांचा समावेश आहे. गंगानगर भागातील जवळपास २०० नागरिकांवर या सुविधेचा लाभ घेतला आहे.
पुरग्रस्त भागातील संपुर्ण नागरिकांची तपासणी या फिरत्या दवाखान्याद्वारे करण्यात येणार आहे. तेव्हा आरोग्याच्या शक्य त्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याने या फिरत्या दवाखान्याचा व मोफत औषदांचा पुरग्रस्त भागातील नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन किनवट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी केले आहे.

164 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.