किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी – खासदार हेमंत पाटील ; किनवट, हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिला धीर

किनवट/नांदेड ता. १६ : नैसर्गिक आपत्ती येते तेंव्हा सर्वात अगोदर शेतकरी बांधवांना त्याचा सामना करावा लागतो. मागील आठवडयात संततधार पावसाचा शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील किनवट , माहूर, हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसानीसह, गोठ्यातील जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. तेंव्हा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकपाहणी करुन पंचनामे करण्यात वेळ न घालवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ आर्थिक मदत द्यावी असे खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले .

खासदार हेमंत पाटील यांनी शनिवारी ( ता . १६) हिंगोली लोकसभा मतदारसंघातील किनवट, हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतीची पाहणी केली व शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना धीर दिला. मागील एक आठवड्यपासून पडत असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचीच दाणादाण उडाली आहे. किनवट , तालुक्यातील अप्पारावपेठ, शिवनी, जलधारा , झळकवाडी मलकजाम, यासह अनेक भागात नदीनाले याना आलेल्या पुरामुळे शेतीचे आणि नागरिकांच्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. अनेक भागात पुरामुळे गावांचा संपर्क तुटला होता . मुसळधार झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा शेतीला बसल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचे पूर्ण पीक गेले आहे पुरामुळे शेतीसुद्धा खरडून गेल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी दुबार आणि तिबार पेरणी केल्यानंतर नुकत्याच उगवलेल्या सोयाबीन , कापूस, मूग, उडीद पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी जमीनच खरडून गेल्याने आता पेरायचे कुठे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला व घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासना कडून तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नुकसानग्रस्त याभागातील शेती आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अर्थी मदत देण्यात यावी. आर्थिक मदत कामात दिरंगाई केल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी संबंधितांना दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख ज्योतीबा खराटे,तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे , माजी जि. प .सदस्य, सूर्यकांत आरंडकर, अब्दुल रब सरपंच, विनायकराव देशमुख, भुमेश किनी, भोजा रेडी, , तालुका संघटक मारोती दिवसे,जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड, माजी उपसभापती गजानन कोल्हे, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड,सचिन पाटील, माधव बैलवाड, साई रुद्रावार, प्रमोद केंद्रे, तहसीलदार मृणाल जाधव़़ व तालूका कृषी अधिकारी बालाजी मुंडे आदी उपस्थित होते .

163 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.