किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पहिल्या पावसातच पुलाला पडले खड्डे

मांडवी प्रतिनिधी
मांडवी ते सारखणी या रोडवर अनेक पुलाचे बांधकाम झालेले असून या पुलाच्या बांधकामाकडे शासकीय बांधकाम विभाग व गुणवत्ता विभाग यांनी वेळीच लक्ष दिले असते.तर मांडवी परिसरातील मांडवीच्या लगत असलेल्या नवीन पुलाला खडा पडला नसता. नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे पण ते पूल नवीन असतानाच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले व पूर्णपणे पाणी टाकले नसल्यामुळे हा पुल पूर्ण पणे क्युरिंग झाले नाही व पुल वाहतूकीसाठी खुले करण्यात आले त्यामुळे पहिल्या पावसातच पुलावर खड्डे पडले असून रस्त्यावरून जाणारे वाहनास वाहतुक करण्यास अडचण निर्माण होत आहे. या पुलाचे बांधकाम करत असताना दर्जेदार मालाचा उपयोग न करता हलक्या प्रतीचे सिमेंट वापरल्यामुळे चांगल्या प्रकारे क्युरिंग झालेली नसल्याने या पूलास मोठा खडा पडलेले आहे .तरी या विभागाने त्वरित लक्ष देवून या पुलाची बाधनी करावी अशी वाहन चालक याच्या कडून मागणी होत आहे.

89 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.