किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नांदेड सायबरची उल्लेखनीय कामगीरी..69 लाखची रक्कम सायबर गुन्हेगाराच्या तावडीतून संबंधित व्यक्तीस परत

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.21.Dream-11 App मधून मिळालेले प्रथम 1 करोड रू चे बक्षिसामधून governmet टॅक्स minus होऊन उरलेली रू.69 लाखची रक्कम सायबर गुन्हेगाराच्या तावडीतून संबंधित व्यक्तीस परत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदेड येथील एका व्यक्तीने दि. 10/05/2021 रोजी IPL मधील गुजरात टायटन विरूध्द लखनउ सुपर जॉयंटस या मॅचचे वेळी Dream 11 Team App वर स्व्त:ची टीम लावली होती. त्या व्यक्तीची टिम Dram 11 App वर पहिल्या क्रमांकावर आली होती. त्या व्यक्तीला Dream 11 Team कडून 1 करोड रूपयाचे बक्षिस मिळाले होते. त्या व्यक्तीस Dream 11 Team App मध्ये मिळालेल्या बक्षिस वर 30% Tax लागून उर्वरीत रूपये 70 लाख त्याचे Dream 11 अकाँटवर जमा झाले होते.जमा झालेल्या रक्कमेतून त्यांने 1 लाख रूपये स्व्त:चे बँक खात्यात जमा केले होते.

परंतु उर्वरीत पैसे बँक खात्यात जमा करत असताना अज्ञात सायबर गुन्हेगार यांने बक्षिस मिळालेल्या व्यक्तीस कॉल करून सांगीतले की, ‘’Dream 11 Team कडून बोलत आहे. तुम्हाला 1 करोड रूपयाचे बक्षिस लागले आहे.त्या संदर्भात कागदपत्रे पडताळणी करायची आहे ’’, असे म्हणून त्या व्यक्तीकडून OTP घेवून त्याचे Dream 11 Team App वरील मेल आयडी मध्ये बदल केला.

सदर व्यक्तीचे जिकंलेले पैसे बँक अकाउंटवर ट्रान्स्फर होत नसल्याने त्या व्यक्तीने सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथे तक्रार केली.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे व अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांचे मार्गदर्शानाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उबाळे,पोलीस उपनिरीक्षक सोपान थोरवे व पोलीस अमलदार विलास राठोड, मोहन स्वामी यांनी Dream 11 Team यांना तात्काळ ई-मेल व फोन कॉल करून सदर व्यक्तीचे जिंकलेले पैसे तात्काळ फ्रिज करण्यास सांगीतले.

तसेच सदर व्यक्तीस तात्काळ मुंबई येथील Dream 11 Team च्या ऑफीस ला जावुन भेटण्यास सांगीतले.सायबर गुन्हेगाराने सदर व्यक्तीचे मेल मध्ये केलेले बदल व सायबर शाखा नांदेड येथून करण्यात आलेले ई-मेल यावरून सदर व्यक्तीचे Dream 11 Team खाते सस्पेंड करण्यात आले व रक्कम फ्रीज करण्यात आली.

नांदेड सायबर शाखेच्या सुचनेनुसार सदर व्यक्ती मुंबईला संबंधीत Dream 11 ऑफीसला गेल्यावर सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथून प्राप्त् मेलनुसार त्याची खात्री करून त्यास त्याची रक्कम रू. 69 लाख त्याचे बँक खात्यात जमा करून देण्यात आली.सायबर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ कार्यवाही केल्याने त्या व्यक्तीचे Dream 11 Team द्वारे जिंकलेले रू.69 लाख परत मिळाले आहेत.

88 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.