किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

जनशक्ती संघटनेच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी दत्ता बन होटाळकर यांची निवड.

नांदेड : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जनशक्ती संघटनेच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी होटाळा ता.नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता बन होटाळकर यांची निवड करण्यात आली असून. निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष उमाकांत पाटील तिडके व नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर सिंह ठाकूर यांचे हस्ते देण्यात आले आहे. सदरच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात प्रभावशाली संघटना म्हणून नावारूपास येत असलेल्या आणि संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जनशक्ती संघटनेची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा संघटनेचा घटक होण्यासाठी होटाळा ता.नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता बन यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात मागच्या १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या दत्ता बन यांची जनशक्ती संघटनेच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असल्याने ग्रामीण भागात संघटना मजबूत करण्यासाठी बळ मिळणार आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेवून काम करणाऱ्या दत्ता बन यांच्या कामाची दखल घेवून संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमाकांत पाटील तिडके व नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर सिंह ठाकूर यांनी नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी निवड करुन नियुक्ती पत्र दिले आहे. संघटनेचे ध्येय धोरणे व शेतकरी, कामगार, निराधार यांचा आधार होण्याबरोबरच संघटनेची प्रतिमा उंचावण्यासाठी काम करावे अशी अपेक्षा तिडके यांनी व्यक्त केली. यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख प्रभाकर लखपत्रेवार, हिंगोली परभणीचे संपर्क प्रमुख वैभव देशमुख, जिल्हाध्यक्ष शंकरसिंह ठाकूर, जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे,किनवट माहुर विधानसभा उपाध्यक्ष निखिल परचाके,रंगराव देशमुख ,उमेश पवार होटाळकर व अमोल गायकवाड यांची उपस्थिती होती.

376 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.