किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

महाविर चौक भागात स्थागुशाचा छापा;बनावट घड्याळे व सुट्टे भाग जप्त

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.8.टायटन कंपीनीची नक्कल करून टायटन कंपीनच्या नावावर त्या कंपनीची घड्याळे आणि सुट्टेभाग विक्री करणाऱ्या वजिराबाद भागातील एका दुकानावर स्थानिक गुन्हा शाखेने धाड टाकली तेथे 1 लाख 48 हजार रुपयांचा टायटन आणि सोनाटा कंपनीचे बनावट घड्याळ आणि सुट्टे भाग जप्त करण्यात आले.

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, संजीव जिंकलवाड आणि शिंदे हे पथक गौरव शामनारायण तिवारी सोबत 7 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास नंदीग्राम मार्केटमधील दुकान क्रमांक 8, महाविर चौक येथे पोहचले तेथे तपासणी केली असता टायटन कंपनीचे आणि सोनाटा कंपनीचे बनावट घड्याळे व सुट्टे भाग विक्री करण्यासाठी ठेवलेले होते. या सर्व ऐवजाची किंमत 1 लाख 48 हजार रुपये आहे.गौरव तिवारी यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी कॉपीराईट कायदा 1956 च्या कलम 63 आणि 65 सह ट्रेडमार्क कायदाच्या कलम 103 आणि 104 नुसार गुन्हा क्रमांक 67/2022 दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात प्रविण आगलावे हे करीत आहेत.

442 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.