प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची साकोली व लाखनी तालुका कार्यकारिणी जाहीर
भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाची भंडारा जिल्ह्यातील साकोली व लाखनी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. साकोली तालुका अध्यक्षपदी निलय झोडे, लाखनी तालुका अध्यक्षपदी संजय भोले, तर साकोली शहराध्यक्षपदी रूग्वेद येवले यांची निवड करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांच्या साकोली येथील पहिल्याच बैठकीत दोन तालुक्यातील अध्यक्षपदांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांच्या आदेशान्वये व भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे व जिल्हा महिला युवती अध्यक्षा रोहिणी रणदिवे यांच्या उपस्थितीत ५ मार्च २०२२ रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हा कार्यालय साकोली येथे बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते साकोली तालुका अध्यक्षपदी निलय झोडे व साकोली शहराध्यक्षपदी रूग्वेद येवले यांची निवड करण्यात आली.
साकोली येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा कार्यालयात भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांनी सभेचे आयोजन प्रेसमिडीया कार्यालय येथे केले होते. या सभेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य वरीष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संघटनेच्या बळकटीकरणासाठी व एकात्मतेने सदैव संघासाठी अग्रेसर राहणे हा मुख्य उद्देश ठेऊन भंडारा जिल्हा कार्य करीत आहे. या संघाचे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुका पदाधिकारी पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करीत आहेत. असेच कार्य भंडारा जिल्हा पदाधिकारी कायम करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांनी सांगितले. यावेळी साकोली तालुका, शहर व लाखनी तालुक्याची घोषणा करण्यात आली. यात साकोली तालुका अध्यक्षपदी दखल भारतचे निलय झोडे, शहराध्यक्षपदी दखल न्यूजचे ऋग्वेद येवले व लाखनी तालुकाध्यक्षपदी नवप्रहार आणि नवराष्ट्र या वृत्तपत्राचे पत्रकार संजय भोले यांची निवड सर्वानूमते करण्यात आली. साकोली तालुक्यात उपाध्यक्ष न्यूज १५ मराठी साहिल रामटेके, सचिव सकाळ प्रतिनिधी मनिषा काशिवार, सहसचिव दखल भंडाराचे चेतक हत्तीमारे, प्रसिध्दी प्रमुख बीटिव्ही वार्ताच्या निकीता कुंभरे तर सदस्यमधे आपली खबरचे सौरभ गोस्वामी, न्यूज २४ मराठीचे रविंद्र घरत तर सदस्यगणांत नवराष्ट्रचे मेदन लांडगे, देवेंद्र रहांगडाले व वैभव सांगोडे यांचा समावेश आहे. याप्रसंगी नवनियुक्त भंडारा जिल्हा युवती अध्यक्षा रोहिणी रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.