वाई बाजार ता.माहूर येथील अवैद्य गुटखा जप्त
सारखणी/किनवट : दिनांक 03.03.22 रोजीचे 10.00 वाजता
मौजे वाई बाजार येथील शेख रहेमान शेख हसन राहणार वाई बाजार तालुका माहूर जिल्हा नांदेड आरोपीचे राहते घरातील पश्चिम मुखी दरवाजा असलेल्या मधल्या खोलीमध्ये
1)52920-/प्रीमियम नजर 1000 पान मसाला असलेली 14 बॅग त्या प्रत्येकी बॅगेत 27 पुढे एका पुड्या ची किंमत 140 रुपये असा एकूण 52920-/ 2) 79380-/ N-05 प्रीमियम जाफरानी तंबाखू असलेली 98 बॅग त्या प्रत्येकी बॅगेत 27 पुढे एका पुड्याची अंदाजे किंमत 30 रुपये असा एकूण 79380 -/रुपये असा एकूण 132300-/ रुपये चा मुद्देमाल मिळाला.
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला प्रीमियम नजर 1000 पान मसाला व N-05 प्रीमियम जाफरानी हा जीवितास अपायकारक असणारा नमूद गुटका सेवन केल्यास कॅन्सरसारख्या दुर्धर आजार होऊन मृत्यू होऊ शकतो हे माहित असताना सुद्धा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला प्रीमियम नजर एक हजार पान मसाला व किंमत 132300-/रुपयाचा चोरट्या मार्गाने विक्री करण्याचे हेतूने ताब्यात बाळगलेला मिळून आला . फिर्यादिवरून प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या संबंधीची फिर्याद गजानन रामा कुमरे वय 52 वर्ष व्यवसाय नोकरी Npc 2471 नेमणूक पोलीस स्टेशन सिंदखेड तालुका माहूर यांनी दिल्यावरुन) गुरन व कलम :- 22/2022 कलम 328,372,273,188 भादवी व अन्नसुरक्षा मानके अधिनियम 2006 कलम 26(2),(1),30(2)(A),59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PSI राठोड पोस्टे सिंदखेड हे पुढील तपास करीत आहेत.