किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नगर परिषद हद्दीतील डी.पी रस्त्यावरिल उर्वरीत स्मशानभुमीच्या कुंपण भिंतीचे अतिक्रमण काढुन टाकण्यात यावे अन्यथा 26 जाने. रोजी आंदोलन

येत्या 26 जानेवारी पुरवी बेलोरी डि.पी.रस्तावर शिल्लक असलेले कबरस्तान चे अतिक्रमण पाडुन पालीका प्रशासनाने रहदारीसाठी खुला न केलयास याभागातील शेकडो शेतकऱी आणि बेलोरी, पिपंळगाव ,कोलामखेडा सहित बैलगाडया,जनावरे आणुन आम्ही याच डि.पी.रस्त्यावर रेल्वे गेटजवळ आमरण उपोषणाला बसणार आहोत. आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगीतले

किनवट ता. प्र दि २२ तालुक्यातील सुमारे २ हजार ५०० ते ३ हजार एकर परिसरातील शेतक-यांकरिता अत्यावश्यक असलेला किनवट शहरातील नगर परिषद हद्दीतील डी.पी रस्त्यावरिल उर्वरीत स्मशानभुमीच्या कुंपण भिंतीचे अतिक्रमण काढुन टाकण्यात यावे या करिता या भागातील शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेतला असुन शेतक-यांच्या शिष्टमंडळाने दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी सदर प्रकरणी मा.तहसिलदार किनवट यांची भेट घेऊन त्यांना शेतात रहदारी दरम्यान होत असलेल्या त्रास व गैरसोई बद्दल आपला रोष व्यक्त केला आहे.
दिनांक २१ जानेवारी २२ रोजी मुख्याधिकारी व तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात अतिक्रमण बाधीत गावातील शेतक-यांच्या महाशिष्टमंडळाने असे नमुद केले आहे कि, जर प्रशासनाने संबधित श्मशानभुमीच्या कुंपण भिंतीचे अतिक्रमण काढले नाही तर परिसरातील शेतकरी दिनांक २६ जानेवारी २२ रोजी सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असुन यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतक-यांचा समावेश असणार आहे तर बैलगाडी, ट्रक्टर , शेतकरि शेत मजुर असे प्रचंड मोठे व भव्य आंदोलन प्रशासना विरुध्द केले जाणार असल्याचे निवेदनात नमुद केलेले असल्याने आता या प्रकरणी प्रशासन काय भुमिका घेते याकडे सर्व शेतक-यांचे लक्ष लागले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ रोजी नगर परिषद प्रशासनाने सर्व कायदेशिर प्रक्रीय पुर्णकरुन येथिल अतिक्रमण बाधित नागरीकांचे नव्या जागेवर पुर्नवसन करुन त्या डि.पी रस्त्यावरिल अतिक्रमण हटवले होते तरी सदर रस्त्यावर पुर्वीच्या अतिक्रमणाला अणुसरुन खोजा धर्मियांच्या स्मशानभुमीचे अतिक्रमण झालेले आहे. परंतु मुळ अतिक्रमण हटवण्यात आल्याने या प्रकरणी माशी कुठे शिंकली कि यात काही राजकिय कार्यकर्त्यांनी काडीकर्ताची भुमिका बजावली यामुळे या स्मशानभुमीचे अतिक्रमण प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन या प्रकरणाचा निकाल लावण्याचे ठरवल्याने दिनांक २६ जानेवारी २२ रोजी आक्रमक भुमीका घेऊन प्रशासना विरुध्द आंदोलन करण्यात येणार असल्याचे सादर केलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
तर शेतक-यांच्या शिष्टमंड्ळाने सादर केलेल्या दिनांक २२ जानेवारी २२ रोजीच्या निवेदनावर माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, माजी नगरसेवक रामराव इटकेपेल्लीवार, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष किरण तिरमनवार, कॉग्रेसचे पर्यावरण विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रभाकर नेम्मानिवार, शेख नजीर शेख इब्राहिम, कावळे सम्राट उध्दवराव, माधव कोल्हे, राजु मुकुंदराव नेम्मानिवार, नरेश कट्टावार, अशोक जलगमवार, मनोज तिरमनवार, रितिष कट्टावार, सुनिल पिसारीवार, राजकुमार नेम्मानिवार, विनोद कोल्हे, गंगन्ना नेम्मानिवार, सुभाष चाडावार, अभिजित ताडपेल्लीवार, कुणाल माडपेल्लीवार, नचिकेत नेम्मानिवार, प्रभाकर नेम्मानिवार, श्रीनिवास नेम्मानिवार, अनिल नेम्मानिवार, दिनेश कावळे, राजु नेम्मानिवार, अशोक कावळे, केतन किनवटकर, रमेश शेरलावार, गजानन राठोड, मधुकर नेम्मानिवार, संतोष नेम्मानिवार यांच्यासह अनेक शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत. तर विविध अधिका-यांना भेटी दिले असता यांची उपस्थिती होती.

425 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.