दिवस-रात्र मिनी लाकूड कटर मशीन चालू ; कर्णकर्कश आवाजाने जनता त्रस्त् कार्यवाही ची शिवसेनेचे भंडारवार यांची मागणी
किनवट तालुका प्रतिनिधी : किनवट गोकुंदा शहर पैनगंगा अभयरण्याला लागून असल्याने लाकूड कटाईचे आरामशीन बंद करण्याचा काही वर्षापूर्वी वनविभागाने निर्णय घेतला या निर्णयाची अमंलबजावणी तर सोडाच या परिसरात शहराच्या प्रमुख रस्यााकवर किमान 400 च्या वर सागवान फर्निचर मार्ट असून प्रत्येक दुकानात मिनी लाकूड कटर असल्याने दिवस-रात्र या मशीनच्या कर्णकर्कश आवाजाने जनता त्रस्त् असून सुर्यास्तापासुन ते सुर्योदयापर्यंत लाकूड कटाईचा मशीन चालविता येत नाही वनविभागाच्या अक्षेम्य् दुर्लक्षपणामुळे विनापरवाना सुरू असलेल्या फर्निचर मार्ट वर तात्काळ निर्बंध लावून सागवान फर्निचरचे वाहतूक परवाना देणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक व्यंकट भंडारवार यांनी उपवनसंरक्षक नांदेड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
किनवट शहरातील सागवान फर्निचर मार्ट मोठयाप्रमाणात दिवस-रात्र सुरू असून याला वेळेचे बंधन राहीले नसुन यावर संबंधीत वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांची अंकूशच नसल्याने दुकानातच लाकूड कटाई मशीनव्दारे कर्णकर्कश आवाज करीत हा उद्योग सुरू असून या बाबत वनविभाग व नगर परिषदेकडे शांतता प्रीय नागरीकांनी अनेक तक्रारी केल्यानंतरही त्याचा उपयोग झाला नाही. रात्रीच्या वेळी तर आय्यप्पा स्वामी मंदिर, मांडवारोड, गोकुंदा, पैनगंगा अभयारण्याक्षेत्रातून सायंकाळी अंधार पडताच या अंधाराचा फायदा घेत अवैध सागवान लाकूड किनवट शहरात व गोकुंदयात मोठयाप्रमाणात येत असून याची धरपकड व कार्यवाही नाममात्र होते. हे सागवान लाकूड जातो कुठे हे सांगण्यासाठी ज्योतीषाची गरज नाही तीन ते चार मिटर अधिकृत सागवान खरेदी करून वर्षेभर त्याच पासवर फर्निचर विक्रीचा गोरखधंदा सुरू असून याला जबाबदार फर्निचरचे वाहतूक पास देणारा कर्मचारी असून गेल्या अनेक वर्षापासुन एकाच ठिकाणी त्यांनी ठाण मांडले असून वनविभागाच्या कार्यालयाला लागून कर्मचाऱ्याच्या एका निवासस्थानात चक्क् कार्यालय थाटले असून याठिकाणी 2 खाजगी व्यक्तीकडून कार्यालयीन कामे केली जात असल्याचा गंभीर आरोपही व्यंकट भंडारवार यांनी या निवेदनात केला असून फर्निचरच्या दुकानात तिसऱ्याच व्यक्तीला पाठवून मोजमाप घेतल्या जाते त्यामुळे अवैध सागवान वैध करण्याचा प्रयत्न् होत असून अशा दुकानाला परवाना सक्तीचा करावा व पास देणाऱ्या कर्मचाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करून सक्षम कर्मचाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती करून फर्निचर मार्टचा दुकानाच्या वेळेचे बंधनही पाळले जावे दोन्ही शहरातील फर्निचर मार्टचे आवाजामुळे त्रास दायक ठरलेले दुकानेही मानवी वस्तीच्या बाहेर स्थलातंर करून शहरवासींयाचे यातून मुक्तता करावे विपूल वनसंपदेने नटलेल्या किनवट तालुक्यातील राखीव जंगलाचे वाळवंट होण्यापासुन वाचवावे असेही सेनेचे तालुका संघटक व्यंकट भंडारवार यांनी उपवनसंरक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.