किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पुस्तकं हे स्वतःला अभिव्यक्त करण्याचे सशक्त माध्यम आहे. त्यामुळे अधिकाधिक वाचन करून स्वतःला समृद्ध करावे.. -मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर ‘शब्दगंध’ काव्यसंग्रहाचे सीईओच्या हस्ते प्रकाशन !

नांदेड ( प्रतिनिधी ) :
पुस्तकं हे स्वतःला अभिव्यक्त करण्याचे सशक्त माध्यम आहे. त्यामुळे अधिकाधिक वाचन करून स्वतःला समृद्ध करावे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी ‘ शब्दगंध ‘ कविता संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी प्रतिपादन केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेचे शिक्षक व सर्जनशील कवी किनवट येथे कार्यरत राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर व भोकर येथे कार्यरत शिक्षक मिलिंद जाधव यांनी संपादित केलेल्या ‘ शब्दगंध ‘ प्रातिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आले. पुढे बोलताना त्यांनी या कवितासंग्रहाच्या निर्मितीबद्दल क्रांतीसूर्य प्रकाशन व शिक्षकांच्या धडपडीचे कौतुक केले.

यावेळी लेखा व वित्त अधिकारी कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, सुनिता कळम पाटील, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, समग्र शिक्षाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.विलास ढवळे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख आदींची उपस्थिती होती.

राज्यातील त्रेसस्ट शिक्षक- कवींच्या सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक आशयांच्या प्रातिनिधिक कवितांचा काव्यसंग्रह क्रांतीसूर्य प्रकाशनाने प्रकाशित केला असून संग्रहाला शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा शुभेच्छा संदेश मिळाला आहे, तर बालभारतीच्या किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांची प्रस्तावना आहे.

प्राचार्या शुभांगी ठमके, प्रा. गजानन सोनवणे, प्राचार्य पंढरीनाथ शेळके, आर. आर. जाधव, माधुरी देवरे, अनिता मेस्त्री, शिवशंकर पाटील, माधुरी शेवाळे, चंद्रकांत कदम, राणी नेम्मानिवार, प्रा. विलास हनवते, वैशाली कयापाक, गजानन पाटील, माधुरी काकडे, धनंजय सोनकांबळे, वर्षाराणी मुस्कावाड, व्‍यंकटी कुरे, संध्या रायठक, सुरेश इंगळे, साहेबराव डोंगरे, सुनिता येवले, बबन मुनेश्वर, देविदास वंजारे, उषा नळगीरे, आनिला मुंगसे, प्रा. विनोद कांबळे, सारिका बोबे, सागर चेक्के, स्वप्नीला पंडित, उर्मिला परभनकर, अंबादास इंगोले, कल्पना राठोड, सिद्धार्थ सपकाळे, प्रा. वंदना तामगाडगे, मिलिंद कंधारे, महानंदा बुरकुले, संतोष पहुरकर, डॉ. प्रतिभा झगडे, नंदा नगारे, प्रा. एस. डी. वाठोरे, मंगला शेटे, महेंद्र नरवाडे, भुमय्या इंदूरवार, रतन कराड, भारतध्वज सर्पे, कोमल शिंदे, रुपेश मुनेश्वर, उषाताई शेटे, राजेश पाटील, प्रतिभा बोबे, शेषराव पाटील, ज्योती देशमुख, रामस्वरूप मडावी, जितेंद्र आमटे, माया सलगरकर, भोला सलाम, प्रा. सुभाष गडलिंग, प्रकाश टाकळीकर, एम. एम. भरणे, सीमा पाटील आदिंच्या कवितांचा समावेश आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम कानिंदे, रवी ढगे, साहेबराव डोंगरे, महेंद्र नरवाडे आदींनी सहकार्य केले. शब्दगंध हा प्रातिनिधीक काव्यसंग्रह शिक्षकांच्या नवनिर्मितीचा साक्ष देणारा व लेखन चळवळीस प्रेरक ठरणारा आहे.

497 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.