प्रतिनिधी, कंधार
———————
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा सन २०२१ चा मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्कार कंधार येथील पत्रकार राजेश्वर कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, पुष्पहार असे आहे. लवकरच हा पुरस्कार पत्रकार राजेश्वर कांबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
राजेश्वर कांबळे हे धाडसी व प्रभावशाली पत्रकार आहेत. गेली आठरा वर्ष पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. समाजातील अनेक प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचे काम ते करतात. सकारात्मक व नकारात्मक बातम्यांमुळे ते लोकप्रिय आहेत. आपल्या लेखनातून शोधपत्रकारितेचा ठसा त्यांनी उमटवला आहे. राजेश्वर कांबळे यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे. अनेक तरुण पत्रकरांना त्यांनी मदत केली आहे. निर्भीड व अभ्यासू पत्रकार म्हणून ते ओळखले जातात. २०१८ मध्ये कंधार नगरपालिकेसाठी केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियानाचे त्यांनी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही काम करत आहेत. त्यांनी विविध संघटनेचे महत्वपूर्ण पदे भूषविले आहेत. आतापर्यंत त्यांना नेहरू आंतरराष्ट्रीय सामजिक पुरस्कार, राज्यस्तरीय पत्रकारत्न पुरस्कार, कोविड योद्धा पुरस्कार, पत्रकारिता सन्मान पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे जीवन संघर्षमय आहे. त्यांच्या जीवनावर आधारित नऊ लेख वृत्तपत्रातून प्रकाशित झाली आहेत.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिले जातात. उत्कृष्टवार्ता व शोधवार्ता गटासाठी प्रवेशिका मागविण्यात येतात. तज्ञ परीक्षकांकडून पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाते. पुरस्कार विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. यंदा कंधार येथील पत्रकार राजेश्वर कांबळे यांनी लिहिलेल्या ‘कोरोना रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका ठरतेय जीवनदायी’ या बातमीस मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’(तृतीय) पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ही बातमी २५ एप्रिल २०२१ मध्ये प्रकाशित झाली होती. जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, पुष्पहार असे आहे. लवकरच हा पुरस्कार पत्रकार राजेश्वर कांबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या पत्रकारितेचा गौरव आहे. या पुरस्कारामुळे माझे मनौधैर्य वाढणार आहे. बातमीस पुरस्कार मिळणे अभियानाची बाब आहे. उदगीर तालुका पत्रकार संघाचा मी आभारी आहे. नवोदित पत्रकारांना हा पुरस्कार अर्पण करतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
57 Views