तरीही पत्रकारिता जिवंत आहे ! आज पत्रकार दिन.
नवीन वर्षात म्हणजे ६ जानेवारी म्हणजे मराठी पत्रकार दिन आहे. महाराष्ट्रातील मराठी पत्रकार दरवर्षी हा दिवस ‘दर्पण दिवस म्हणून साजरा करतात.राज्यातील पत्रकारांसाठी हा दिवस स्भाभिमानाचा आहे.पण मावळत्या वर्षात राज्यात पत्रकार संकटे आली,वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला.१९७६ च्या आणीबाणीनंतर ते२०२० मध्ये मराठी पत्रकारांबाबत घडलेले आहे.हे विसरता येणारे नाही.या दर्पण दिना निमित्ताचा मागील घटनांने स्मरण करण्याचे महत्वाचे कारण आज पत्रकार कोठे आहे? हे कळेल.
भारतीय घटनेच्या घटनेच्या कलम १९( १) नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार देण्यात आलेला आहे.या घटनेत वृत्तपत्रासाठी वेगळे स्वातंत्र्य उल्लेख नाही.त्यामुळे याच कलमांतर्गत वृत्तपत्र स्वातंत्र्याचा समावेश होतो.हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेले आहे.स्वातंत्र्यापूर्वी,स्वातंत्र्यानंतरही वृत्तपत्रांचे देशाच्या चळवळीत व विकासात योगदान ठरलेले आहे.आजही वृत्तपत्राचे योगदान नाकारता येणार नाही.भारतीय वृत्तपत्र सृष्टीच्या विकासात पाच कालखंड पडतात.पहिला कालखंड १७८०- १८१८(३८ वर्षे )दुसरा१८१८-१८८५ (६७ वर्षे)तिसरा १८८५-१९४७ (६२वर्षे) चौथा १९४७-१९८९ ( ५० वर्षे) आणि पाचवा १९८९- २०२०(३१ वर्षे) असे महत्वाचे कालखंड आहेत.मराठी पत्रकारितेचा जन्म ६ जानेवारी १८३२मध्ये झाला.याचे जनक बाळशास्री जांभेकर आद्य संपादक आहेत.त्यांनी मुंबईच्या काळबादेवी येथून “दर्पण” नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सूरु केले.हे वृत्त पत्र इंग्रजी व मराठी या व्दिभाषेत भाषेत प्रकाशित केले जात असे. दर्पणकारांना दहा भाषांचे ज्ञान अवगत होते.त्यांनी प्राध्यापक, शिक्षक म्हणून नोकरी केली.त्यांची ग्रंथसंपदा मोठी आहे.’ शून्यलब्धी’आणि मूलपरिणती तसेच ‘इंग्लड देशाची बखर’सारखे ग्रंथ लिहिले.त्यांनी १८४५ मध्ये ज्ञानेश्वरीची पहिली मराठीतील पहिली संशोधित मुद्रीत प्रत काढली.त्यांनी धर्मांतराला वाचा प्रथम फोडण्याचे काम केले आहे. एका बदनामीच्या खटल्यात त्यांना आठशे रुयये दंड झाला.नंतर८ जुलै १८४०मध्ये दर्पण हे बंद पडले.म्हणजे ते आठ वर्ष चालले. त्यावेळी वर्षभरात तीनशे वाचक संख्या झाली होती.
त्यांनी दिग्दर्शन हे मराठी नियकालिका सुरु केले. साहित्य,इतिहास तत्वज्ञान या विषयाने वाहिलेले भारदस्त मासिक होते.दर्पण चालकांनी पूर्ण मराठी भाषेचे वृत्तपत्र म्हणून “मुंबई अखबारका’ सुरु केले होते.दर्पणच्या परंपरेत प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन २४ आॅक्टोबर १८४१मध्ये केले होते.यावेळी १९४२ मध्ये अहमदनगर येथे ‘ज्ञानोदय’ मासिक सुरू झाले.त्याचे रेव्हीरंड हेन्नी बॅललंटाईन संपादक होते.या संपादकात ना. वा.टिळक,देवदत्त टिळक,दि.शं सावकरकर यांचा समावेश होता.मुंबईत १८४२ मध्ये विरेश्वर छत्रे यांनी ज्ञानसिंधू साप्ताहिक सुरु केले.पुण्यातून पहिले मराठी वृत्तपत्र निघाले ते म्हणजे मित्रोदय.महाराष्ट्रात केसरीच्या पाठोपाठ सुधारक,काळ, संदेश या वृत्तपत्राची कामगिरी मौलाची आहे.लोकमान्यांच्या निधनानंतर कृष्णाजी खाडीलकर यांनी लोकमान्य दैनिक सुरु केले होते.त्यानंतर त्यांनी नवाकाळ सुरु केला. वृत्तपत्रे ब्राह्मणेत्तर तसेच दलितांच्या प्रश्नांना न्याय देवू शकत नाही,या भूमिकेतून कृष्णाराव भालेकर यांनी ‘दीनबंधू’ पहिले वृत्तपत्र काढले. महात्मा फुले यांचे ‘सत्यशोधक समाजाचा’ याचाही उल्लेख आहे.डाॅ, आंबेडकरांनी मराठी वृत्तपत्राच्या इतिहासात दलित पत्रकारित्तेच्या रूपाने कामगिरी मोलाची आहे.त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता,प्रबुध्द भारत,अशी चार वृत्तपत्र चालविली.मुंबई प्रांतात १८८२ मोबेद फर्दुनजी यांनी मुंबई समाचार हे काढले.हैद्राबाद सस्थानात भाग्येश विजय वृत्तपत्र निघत होते.मराठवाड्यात निजाम राजवटीत अमर ज्योती,निजाम विजय,तसेच मराठवाडा ही वृत्तपत्रे निघाली. मराठवाड्यात १८८६ सर्वात जूने व पहिले वृत्तपत्र म्हणून औरंगाबाद समाचार उल्लेख करावा लागेल.विदर्भातील पहिले वृत्तपत्र १९६७ वर्हाड नावाचे तर १८७०अकोला येथून वैदर्भ हे वृत्तपत्र प्रसिध्द होत होते.
आज वृत्तपत्राचे स्वरूप बदलेले आहेत.वृत्तपत्रात नवीन तंत्रज्ञाचा वापर होत आहेत.वृत्तपत्र रंगीत छायाचित्रसह आर्कषक स्वरूपात निघत आहेत.आज महाराष्ट्रात एकूण वृत्तपत्र २१६९ एकूण खप ७९, ०५००० आहे,हे देशपातळीवर १९.३ टक्के आहे.यात आजची पत्रकारिता एक व्यवसाय बनलेला आहे.यात अधिकतर वृत्तपत्र मालक हे भांडलवदार आहेत.तसेच विविध पक्षांच्या विचाराशी बांधलेली आहेत.देशात पत्रकारांसाठी विविध कायदे, वेतन मंडळ निर्माण केले गेले. १९९६६ मध्ये भारतीय प्रेस परिषदेची स्थापना,१९७८ मध्ये कलम १७ (२) (ख) नुसार वृत्तपत्रासाठी आचार संहिता लागू करण्यात आली.देशात श्रमिक पत्रकारांसाठी वेतन आयोग नियुक्त केले गेले आहेत.नैतिकता हा वृत्तपत्राचा कणा आहे.त्यांनी सत्य,सामाजिक न्यायासाठी लिहिले पाहिजे,अशी अपेक्षा आहे.पण पत्रकार आपला धर्म विसरत चालला आहे.त्यामुळे पित, फेक,पेड न्यूजसारखे शब्द पत्रकार क्षेत्रावर प्रहार करत आहे.यामुळे पत्रकार क्षेत्र कंलकित केले जात आहे.वृत्तपत्र मालकांची मूजोरी वाढत चालली आहे. पत्रकारांना वेठबिगार म्हणून वापरले जात आहेत.श्रमिक पत्रकारांना मंजिठीया आयोगाप्रमाणे वेतन अजूनही दिले जात नाही.पत्रकारांना नोकरीची, कुटुंबाची व स्वत:च्या आरोग्याची सुरक्षतता राहिलेली नाही. पुरोगामी महाराष्ट्रात तर पत्रकारांच्या सुरक्षतेसाठी पत्रकार संरक्षण कायदा करण्यात आला.पण उलटेच होत आहे,राज्य सरकारच खोटे वृत्त दिल्याच्या कारणावरून पत्रकारांना जेलमध्ये टाकले गेले असे, पुरोगामी राज्यात कधीच घडलेले नाही.हा पत्रकार स्वातंत्र्यावर हल्ला असतानाही राज्यातील पत्रकार एकवटला नाही,हे दुर्देव.देशात व राज्यात २०२० मध्ये करोनाचे मोठे संकट आले.यावेळी पत्रकारांनी जीव धोक्यात टाकून काम केले.यात राज्यातील ५० वर पत्रकारांचा बळी गेला आहे.या मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना ना वृत्तपत्र मालकांनी व राज्य शासनाने आर्थिक मदत केलेली नाही,असे नतदृष्ट व स्वार्थी सरकार व वृत्तपत्र मालक आहे.यात बड्या वृत्तपत्र मालकांनी तर स्वत: च्या वृत्तपत्र व्यवसायच तोट्यात आला,असे कारण देत श्रमिक पत्रकारांनाच नोकरीवरून काढले.इतकेच नव्हे,आजही पत्रकार व कर्मचार्यांच्या वेतन कपात केली जात आहे. तरी मी पत्रकार संघटना गप्पच!पत्रकारांवर होत असलेल्या या अन्यायाची एकही ओळ कोठेही प्रसिध्द झालेली नाही.समाजाच्या सतत व्यथा मांडणार्या पत्रकार पण त्याच्याच व्यस्था कोणी मांडत नाहीत! वृत्तपत्र क्षेत्रात काय उद्योग चालतात? पत्रकारावर काय अन्याय होतो? समाजाला व वाचकाला माहित नसावे.वृत्तपत्र, व पत्रकार स्वातंत्र्य म्हणजे ‘दूर डोंगर साजरा’ असे आहे.वृत्तपत्रात नफा झाला तर तो मालकाचा व तोटा झाला तर पत्रकार व कर्मचार्यांच्या माथ्यावर मारला जातो आहे, हा कोणता न्याय आहे.वृत्तपत्रात पत्रकार व त्यात काम करणारे कर्मचारी हा एक परिवार मानला जातो.अश्या संकटकाळात वृत्तपत्र मालकाने पत्रकाराला सांभाळयाचे असते.पण त्यांनीच पत्रकारांना वार्यावर सोडले.पण निर्दयी राज्य सरकारला व वृत्तपत्र मालकांना पत्रकार, कर्मचार्यांची दया आलेली नाही.पत्रकार क्षेत्र, आत पोकळ, बाहेर पोकळ, डोगर्यांचा वेळू असे आहे.यात ग्रामीण पत्रकारांना पत्रकारच मानले जात नाही,तो प्रश्न वेगळाच आहे.वृत्तपत्र समाजाचा आरसा आहे,पण त्या आरश्यात पारदर्शकता राहिलेली नाही.आज वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकार,कर्मचारी संकटात सापडलेला आहे.त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे.याकडे कोणाचे लक्ष नाही.तरीही आज महाराष्ट्रात पत्रकारिता जिवंत आहे, हे विशेष.
कमलाकर जोशी, ज्येष्ठ पत्रकार नांदेड