सौ.मंदाताई डाॅ.अर्जून चव्हाण यांना सेवानिवृत्तीबद्धल उपजिल्हा रुग्णालय वर्तुळातून शुभेच्छा
किनवट/प्रतिनिधी— सौ.मंदाताई डाॅ.अर्जून चव्हाण यांची ३ सप्टेबर १९८७ रोजी गोकुंदा येथिल तत्कालीन कुटीर रुग्णालयात अधिपरिचारिकाच्या पदभारापासून सेवाकाळाला सुरुवात होऊन शेवटी सहायक अधिसेविका या पदोन्नतीवर याच गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयात त्या (३१ डिसेंबर २०२१) सेवानिवृत्त होतात हा कमालिचा योगायोग म्हणावा लागेल. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्धल उपजिल्हा रुग्णालय वर्तुळातून शुभेच्छा देण्यात आल्या.
किनवट शहराचे अविभाज्य अंग संबोधल्या गेलेल्या गोकुंदा येथे सुरुवातीला कुटीर रुग्णालय अस्तित्वात आले त्या काळात म्हणजेच ३ सप्टेबर १९८७ रोजी सौ.मंदाताई डाॅ.अर्जून चव्हाण यांनी अधिपरिचारिका पदाची सुत्रे स्विकारली होती. कालांतराने याच रुग्णालयाचा विस्तार होऊन ग्रामिण रुग्णालय असतांनांही त्यांनी सेवा बजावली.
सौ.मंदाताई चव्हाण यांच्या ३४ वर्ष ४ महिन्याच्या सेवाकालखंडात गोकुंदासह सामान्य रुग्णालय लातूर, ग्रामिणरुग्णालय हिमायतनगर, ग्रामिण रुग्णालय भोकर येथे इनचार्ज, त्यानंतर सहायक अधिसेविका ही पदोन्नती मिळाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय देगलूर आणि गोकुंदा ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाले त्यानंतर त्यांनी या रुग्णालयात सहा महिन्यापासून प्रतिनियुक्तीवर सेवाकाळ बजावत असतांना सेवाकाळ पूर्ण झाला. निर्विवाद ३४ वर्षाच्या सेवानिवृतीमुळे त्यांच्या चाहत्यांसह रुग्णालय वर्तुळातून शुभेच्छा दिल्या. सौ.मंदाताईंनीही सर्वांचे आभार व्यक्त केले.