नादेड सिडको येथे शिवभोजन केंद्राचे उदघाटन संपन्न*…. *शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची चांगली संधी..सौ.आशाताई शिंदे
नांदेड दिनांक.:
महाराष्ट्र शासनाच्या महाविकास आघाडी सरकारच्या वतीने गरीब आणि गरजू जनतेसाठी शिवभोजन थाळी चे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून ढवळे कॉर्नर,उस्माननगर रोड,सिडको नांदेड येथे क्रांतिवीर लहुजी साळवे सेवाभावी संस्था हाळदा संचलित शिवभोजन केंद्राचे उदघाटन रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी कंधार लोहा मतदार संघाच्या लोकप्रिय समाजसेविका सौ आशाताई शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या उदघाटन कार्यक्रमाला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर, कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष आनंद गुंडले, उद्योजक माधव डोम्पले,नांदेड तालुका शिवसेना प्रमुख व्यंकोबा येडे पाटील,लोकस्वराज्य आंदोलन कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दादा पवार, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांना उत्कृष्ट असे भोजन देऊन क्रांतिवीर लहुजी साळवे सेवाभावी संस्थेने एक चांगला उपक्रम राबवावा असे आवाहन सौ. आशाताई शिंदे यांनी केले. आघाडी शासनाच्या काळातील हा अत्यंत महत्वाचा आणि गरजू जनतेसाठीचा उपक्रम सर्व संस्थांनी नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्याचे आवाहन आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी केले. तर आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी या शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असून त्याचा फायदा गरजू जनतेनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार बालाजीराव कल्याणकर,सौ समाजसेविका आशाताई शिंदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवभोजन केंद्राचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. क्रांतिवीर लहुजी साळवे सेवाभावी संस्था हाळदा चे अध्यक्ष आनंदा कांबळे आणि संतोष तेलंग यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रा. डॉ शशिकांत हटकर, नितीन पाटील, बशीर शेख, गिरीश डिगोळे,अंकुश ढाकणीकर. सुभाषराव वाघमारे,युवक काँग्रेसचे साईनाथ बसवंते, दीपक रेडे,बाळासाहेब टिकेकर,माणिक कांबळे, देविदास सूर्यवंशी, माधवराव राजकौर, वैजनाथ माने, प्रा. सुनील नामपल्ले, सुरेश भाग्यवंत,किशन गोरेकर,सुरेश जळपतराव आदींची उपस्थिती होती..