महाराष्ट्रातील मातंग समाज वस्त्यांना संरक्षण द्यावे- वसंतराव जोगदंड
रिसोड:- तहसील कार्यालय रिसोड येथे दि.९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ठीक २ वाजता रिसोड चे न्यायदंडाधिकारी साहेब तथा तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना मानवहीत लोकशाही पक्ष व लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे संयुक्त विद्यमाने निषेध निवेदन श्री वसंतराव जोगदंड सर हराळ वाशिम जिल्हा उपाध्यक्ष लसाकम तथा विदर्भ अध्यक्ष मानवहीत लोकशाही पक्ष कर्मचारी आघाडी व सौ.पप्पीबाई कदम सभापती पाणी पुरवठा समीती न.प.रिसोड यांचे नेतृत्वात नीषेध निवेदन देण्यात आले.निवेधनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजावर वारंवार हल्ले होत आहेत.त्यामुळे महाराष्ट्रातील मातंग वस्त्यांना संरक्षण द्यावे.नुकतेच ४डिसेबर २०२१ रोजी मौजे लोणी (टाकळी) ता.चादुर रेल्वे जि.अमरावती येथील मातंग समाजाची मृतक महीला उषाताई खडसे शौचास गेली असता तिचे वर गावातील अज्ञात इसमा॑नी अतिप्रसंग करून खुन करणार्या गावातील अज्ञात इसमा॑चा लवकरात लवकर शोध घेवुन कायदेशीर कडक कारवाई करावी व मृत महीलेस न्याय देण्यात यावा.अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत यासाठी शासनाने मातंग समाजाच्या वस्त्यांना संरक्षण देण्यात यावे. वरील कृत्य हे पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीला ,परंपरेला व शाहु, फुले, आंबेडकर , आन्नाभाऊ यांचे नाव घेऊन, न्याय,समता,बंधुता हे विचार घेऊन शासन करणार्या शासणाला शरमेने मान खाली घालावयास लावणार्या घटनाचा आम्ही निवेदनावर सह्या करणारे वसंतराव जोगदंड,सौ पप्पीबाई कदम, सुखदेव कांबळे,भारत अभोरे विदर्भ संघटक, रवि आढाव प.स.सदस्य, उकंडी गायकवाड सरपंच लेहनी,लक्ष्मण ताकतोडे रिसोड तालुका मार्गदर्शक महीपती इंगळे शहराध्यक्ष, आनंदराव ताकतोडे,तुकाराम पारीस्कर, मोहनराव साठे, एम.टी.काबळे, श्रीराम ताकतोडे, त्र्यंबक पारीस्कर,आत्माराम धुमाळ,,दिपक इंगळे, प्रकाश मानमोठे, रवि खवळे,पवन हुबाड,सुरज इंगळे,विजय पिसुळे,अजय कांबळे,अजय कांबळे,अजय झेंडे, विशाल गाडे,गौरव कांबळे शुभम लोखंडे,आदी समाज बांधवांच्या वतीने वरील कृत्याचा माहीत लोकशाही पक्ष व लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महाराष्ट्र राज्य व समाज बांधवांचे वतीने जाहीर निषेध करतो.