मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर घुगे यांनी कोविड १९ लसीकरण संदर्भात घेतली आढावा बैठक
किनवट/प्रतिनिधी: किनवट येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे जिल्हा परिषद नांदेड यांनी कोविड १९ लसीकरण संदर्भात आढावा बैठक घेतली.
सदर बैठकीस वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, टीएचओ यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बैठकीस डॉ.बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी, श्री.प्रशांत दिग्रसकर मा.शिक्षणाधिकारी, डॉ मृणाल जाधव तहसिलदार, श्री.धनवे बिडीओ,डॉ.मुरमुरे टीएचओ हे उपस्थित होते.
787 Views