वेडसर महिलेचा गळा चिरुन खून अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल चोरी, दरोडे, खुन, अशा विविध घटनेने लोहा शहर भयभीत
लोहा : प्रतिनिधी शिवराज दाढेल लोहेकर.
लोहा शहरात मंगळवारी मध्य रात्री शनीमंदीरात अज्ञात व्यक्तीने वेडसर महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरून खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंदीरात रक्ताचा सडा पडलेला होता. वेडसर महिलेचा खुन कोणी व का केला? खुनी कोण? या विषयी शहरात चर्चा सुरु असून या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
लोहा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरी, घरफोडी, दरोडा, खुन करणे अशे अनेक प्रकार वाढले असून काही दिवसापुर्वी शहराच्या मध्यभागी असलेल्या मुकदम यांच्या घरी धाडसी चोरी झाली. पंधरा दिवसापूर्वी झका तरुणाला चाकूने भोसकून लुटण्याचा प्रकार घडला होता. त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अशा अनेक घटनाने लोहा शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर गावातील नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.
शहरात वेडसर महिला दिवसभर फिरुन संध्याकाळी शनीमंदीरात झोपत होती. नेहमीप्रमाणे छबुबाई ठाकुर वय वर्षे ६० ही मंगळवारी रात्री मंदिरात झोपली असता तिचा अज्ञात व्यक्तीनी गळा चिरून खुन केला. ती वेडसर महिला मृत अवस्थेत पडलेली होती. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष तांबे, पि.एस.आय. करे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. खुन करणारा फरार झाला असून अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध कलम ३०२ भावदी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे करत आहेत.