किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मुलांचे उज्वल भवितव्य बनविण्याचे खरे मानकरी शिक्षकच सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके

मनीरामथड शाळेतील सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र तर चार विद्यार्थी नवोदय विद्यालयात पात्र

सचिन जाधव दैनिक सायरन सारखणी

येथून जवळच असलेल्या मौजे मनीरामथड ता.माहूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनीरामथड केंद्र करंजी या शाळेतील स.न.2020 – 2021 पर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेत व शैक्षणिक शिक्षणासाठी चार विद्यार्थी नवोदय विद्यालय पात्र परीक्षा पास होण्याची परंपरा राखली असून या परंपरेला दिशा देणारे आणि मुलांना सुप्त कुणाच्या कलेला वाव देणारे येथील प्राथमिक शिक्षक संतोष गंधे सर शिक्षकांनी आर्थिक परिश्रमातून या शाळेतील सात विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा प्राप्त ठरवून मुला मुलीचे उज्वल भविष्य बनविण्याचे खरा मानकरी शिक्षकच आहे असे उदगार सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके हे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा प्रसंगी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा पत्र व मानचिन्ह देऊन गौरवविण्यात आले.


या सत्कार सोहळ्याला शिक्षण विस्तार अधिकारी आर.आर. जाधव व शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर गुट्टे शिक्षण विस्ताराधिकारी आ.एल.मुधोळकर व केंद्रप्रमुख बंडू उईके केंद्रप्रमुख अशोक पप्पूलवाड आदी पत्रकार त्रिंबक पुनवटकर पत्रकार सचिन जाधव पत्रकार डॉक्टर दौरणावर आणि ग्रामपंचायत लोकरवाडीचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य गण आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीमाता व सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
प्रदीप राऊत व संस्कृती माधव पेटकुले हे दोन विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग पाचवा हे राज्य गुणवंता यादी रँक 07 आल्याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला होता.


तसेच या शाळेतील सात पैकी सात विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले असून चार विद्यार्थी नवोदय प्राप्त झाले आहे व दोन विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतन अमरावती येथे निवड झाली आहे हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील असून आज ते राज्याच्या गुणवंता यादीत झळकले आहे या शाळेची पटसंख्या 20 असून वर्ग 1 ली ते 5 वी पर्यंत असून येथे शिक्षक मान्य पद हे दोन असून मात्र येथे एकच शिक्षका वर पूर्ण शाळेचा बोजा आहे.
2021 मधील गुणवंता शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी नमन भारत उमरे, प्रथमेश विनोद चव्हाण आर्यन, संदीप गायकवाड, सौरभ माधव पेटकुले, प्रज्वल विश्वास गायकवाड, तन्मय मारोती प्रधान हे असून त्याच यशाचे मानकरी ठरले असून गुरुवर्य संतोष गंधे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे दिसून आले.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दहेली बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी आर.आर. जाधव म्हणाले की मुलाचे भवितव्य घडवण्यासाठी एका शिक्षकांचे काम नव्हे आई-वडिलांचे सुद्धा मोठे योगदान पाहिजे तरच विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात पुढे जातो.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी आपला लहान पणातील जीवनातील उजाळा दिला मी एक शिक्षक झालो नंतर पुढे माझ्या जीवनातील मोठे यश संपादन केले मी एमपीएससी परीक्षा पास होऊन एक फौजदार झालो ते माझ्या आई आई वडीला पासून ते ज्ञानाचे धडे देणारे गुरुवर्य शिक्षकांनी माझ्या भविष्ययाला खरी कलाटणी दिली.
विद्यार्ध्यांच्या या गौरवशाली यशाबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करून मुलांना भावी पिढी बदल शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष गंधे यांनी केले . याप्रसंगी गावातील व केंद्रातील व परिसरातील पालक, पत्रकार प्रमुख्याने उपस्थित होते.

143 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.