संतोष अडकीने यांनी बहुजन मुक्ती पार्टीतून मुक्त होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला
किनवट (प्रतिनिधी) विधानसभेची निवडणूक लढविलेले बहुजन मुक्ती पार्टीचे युवा नेते संतोष अडकिने यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला असून युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शेख मेहबूब यांच्या हस्ते त्यांनी नांदेड येथे आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे
मागील सुमारे दहा वर्षापासून बहुजन मुक्ती पार्टीत त्यांनी निष्ठेने काम केले या कालावधीत पक्षाचे किनवट तालुका अध्यक्ष तसेच किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशी महत्वाची पदे भूषविली तर बहुजन मुक्ती पार्टीच्या तिकिटावर त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक देखील लढविली आहे दरम्यान पक्षाच्या ध्येय धोरणावर नाराजी व्यक्त करत त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीतून मुक्त होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेतला आहे
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विचाराला प्रभावित होऊन तसेच माजी आमदार प्रदी नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिनांक 30 नोव्हेंबर रोजी संतोष अडकीने यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शेख मेहबूब यांच्या हस्ते आपल्या समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला
शरद पवार यांचे नेतृत्व सर्वसामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देणारे असल्याने तसेच प्रदीप नाईक यांनी आमदारकीच्या काळात विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवून किनवट तालुक्याला समृद्ध केले त्यामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचे सांगत पक्षश्रेष्ठीच्या आदेशाप्रमाणे व मा आ प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकहाती झेंडा फडकविण्यासाठी अथक परिश्रम घेऊन पक्षाचा विश्वास सार्थ ठरवू अशा प्रतिक्रिया अडकीने यांनी पक्ष प्रवेशानंतर दिल्या आहेत याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते बालाजी बामणे,बंटी रावसाहेब जोमदे,अमोल जाधव, बालाजी ठाकरे, प्रमोद राठोड आदींची उपस्थिती होती
एक तरुण, तडफदार युवा नेतृत्व म्हणून संतोष अडकिने यांची संबंध विधानसभा क्षेत्रात ओळख आहे यापूर्वी त्यांनी शेतकरी केंद्राचे कृषि कायदे, पिक कर्ज तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जेदार कामासाठी व्यापक स्वरूपात आंदोलने केली आहेत गोरगरीब सर्वसामान्य लोकांसाठी ते नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करतात त्यामुळे आगामी काळात संतोष अडकीने यांच्या प्रवेशाने किनवट तालुक्यात राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे