पर्यावरण संवर्धन सायकल यात्री कु. प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे हीचा बोधडी बुद्रुक येथे सत्कार संपन्न
किनवट (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धन सायकल यात्री कु. प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे हीचा बोधडी बुद्रुक येथे सत्कार संपन्न झाला. यावेळी उपसरपंच विष्णू दराडे ,प्रवीण श्रीमनवार ,पत्रकार आनंद सोनटक्के ,शैलेश मेश्राम ,सुमित थोरात ,चंद्र देवकर, पांडुरंग गरद स्वार,संजय ताटेकुंडलवार ,लक्ष्मीकांत पवार यांची उपस्थिती होती
मु. पो. पुनवट, ता. वणी, जि. यवतमाळ येथील
वय-21 ची तरुणी कुमारी प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे ही 20 ऑक्टोबर 2020 पासून सायकलीवरून जनजागरण प्रवासाला निघाली आहे. ही तरुणी यशदा, जलसाक्षरता विभागा अंतर्गत – प्रशिक्षित ता. वणी जलदूत
पर्यावरण संवर्धन सायकल यात्री – कृती संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती आहे.
उद्देश – पर्यावरण संवर्धन आणि महिला सशक्तीकरण जनजागृती आणि सामान्य जनजीवनातील परिस्थितीचा अभ्यास
सभोवतालील, दिवसेंदिवस बदलती उपभोगवादी जीवनशैली, वाढते प्रदूषण, तापमानवाढ, अनिश्चित पाऊस , वातावरणदल, ऋतुचक्रबदल, हिम कोसळत आहे, समुद्राची पातळीची वाढ, पुराच्या समस्या , यातून निर्माण होणाऱ्या शेतीच्या आणि आरोग्याच्या समस्या, इतर वाढत्या स्थलांतराच्या समस्या लक्षात घेता, ह्या समस्या का वाढत आहे? या प्रश्नांच्या शोधात सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणेतील अधिकारी व ग्राऊंड लेव्हल वर काम करणारी व्यक्ती, समूह यांना भेटी देणे व जनजागृती उद्देश ठेवून माहिती पोहचविणे, शक्य तितकं लोकांशी समस्याबाबत चर्चा करणे, संवाद साधत त्या- त्या भागातील परिस्थिती समजून घेणे, पर्यावरणाबाबत मानसिकतेचा अभ्यास करत लोकल परिस्थिती समजून घेणे, इत्यादी करत आहे. आणि हा प्रवास आपला महाराष्ट्र जवळून अनुभवण्याचा, जगण्याचा, स्वतः चे स्त्री मुक्ती चे अस्तित्व ही शोधण्याचा प्रवास आहे.
मी सर्